शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक धानपट्ट्यात यंदा पहिल्यांदाच केळी लागवडीची तयारी; १०० हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट

By राजेश मडावी | Updated: May 18, 2023 16:25 IST

मूल तालुक्यातील शेती बदलाच्या उंबरठ्यावर

चंद्रपूर : मूल तालुक्यातील शेतकरी धान उत्पादनात अग्रेसर आहे; मात्र धान रोवणी व उत्पादनातील कमालीची तफावत आणि मिळणाऱ्या अल्प दराने धान उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थचक्र दरवर्षी बिघडत आहे. त्यामुळे तालुका कृषी विभागाच्या पाठबळाने काही शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच केळी लागवडीची तयारी सुरू केली. 

चंद्रपूर जिल्ह्यात मूल, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड तालुक्यात दरवर्षी विक्रमी धान उत्पादन होते. धान पिकांतही अनेक शेतकऱ्यांनी नवनवीन बियाण्यांचा वापर करून जादा उत्पादनाची कास धरली. मात्र, धानाचे प्रति क्विंटल दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत तोकडे असतात. त्यामुळे केवळ पारंपरिक धानाची शेती शेतकऱ्यांना आर्थिक उभारी देऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन मूल तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांनी शेतकऱ्यांना यंदा केळी लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. त्यासाठी गावागावांत बैठकाही घेतल्या.

चिरोली, टेकाडी, राजोली आदी गावांतील शेतकऱ्यांनी केवळी लागवडीची तयारी दर्शविली. अन्य गावेही पुढे येऊ लागले. मूल तालुक्यात २८ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून त्यामध्ये २४ हजार हेक्टरवर भात शेती होते. कपाशी व सोयाबिन लागडीचे प्रमाण तर अत्यल्प आहे. 

शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य

मूल तालुक्यात सिंचनाची मूबलकता असल्याने कृषी विभागाने केळी लागवडीचा पर्याय शेतकऱ्यांना सूचविला. धान उत्पादक शेतकऱ्यांची सकारात्मक मानसिकता तयार झाल्याने केळीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. एमआरजीएस अंतर्गत केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाख ५३ हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

मका लागवड प्रयोग यशस्वी

मूल तालुक्यात कांदा लागवड क्षेत्रही वाढले. कांदा चाळ तयार झाली. मका लागवडीचे क्षेत्र ५०० हेक्टरच्या पुढे गेले. आर्थिक प्रगतीसाठी या तालुक्यातील शेतकरी आता पारंपरिक शेतीचा परिघ ओलांडू लागल्याचे चित्र अन्य तालुक्यांसाठीही प्रेरक ठरावे.

धानपिकासाठी प्रसिद्ध मूल तालुक्यात यंदाच्या हंगामात नगदी पीक असणाऱ्या केळी लागवडीला प्रोत्साहन देण्याचे नियोजन केले. त्यादृष्टीने गावागावांत बैठक घेतल्या. या पिकासाठी शेतकरी सकारात्मक आहेत. पहिल्या टप्प्यात ५० ते १०० हेक्टरवर केळी लागवड होईल, अशी तयारी आहे. -भास्कर गायकवाड, तालूका कृषी अधिकारी, मूल

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र