शेतकरी संघटनेची ‘रास्ता रोको’ आंदोलनाची तयारी
By Admin | Updated: October 24, 2016 00:59 IST2016-10-24T00:59:53+5:302016-10-24T00:59:53+5:30
शेतकरी संघटना कोरपना तालुक्याच्या वतीने येत्या २८ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भोयगाव-कवठाळा मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

शेतकरी संघटनेची ‘रास्ता रोको’ आंदोलनाची तयारी
रस्त्याची समस्या : भोयगाव-कवठाळा येथे चक्का जाम होणार
नांदाफाटा : शेतकरी संघटना कोरपना तालुक्याच्या वतीने येत्या २८ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भोयगाव-कवठाळा मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गडचांदूर-भोयगाव- चंद्रपूर रस्त्याची समस्या कायम आहे. भोयगाव पुलापर्यंत ‘रस्त्यात खड्डे की, खड्डयात रस्ते’, असे चित्र पाहावयास मिळते. वारंवार लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर आता रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार शेतकरी संघटनेने केला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दिवे, उपजिल्हाध्यक्ष अरुण नवले, तालुकाध्यक्ष मारोती काकडे, माजी जि.प. सदस्य अशोक मुसळे, विलास धांडे, प्रविण गुंडावार, समाज कल्याण सभापती निळकंठ कोरांगे, पं.स. सभापती रवी गोखरे, बंडू राजुरकर, प्रल्हाद पवार, मदन सातपुते, अनंता गोडे, प्रभाकर लोडे, गणपत काळे, अविनाश मुसळे, आशिष मुसळे, भास्कर मते, किसन अवताडे, अर्जून कोटनाके, मनोहर झाडे, साईदास रोगे, दादा आस्वले, यादव चटप, पं.स. सदस्य सोयाम, संभाशिव पावडे आदी उपस्थित राहणार आहे.
त्यामध्ये भोयगाव ते कवठाळा रस्त्याचे डांबरीकरण करणे, भोयगाव ते भोयगाव पुलापर्यंत काँक्रेटीकरण, सांगोडा - भोयगाव रस्त्याचे डांबरीकरण, गडचांदूर - नांदाफाटा - वनोजा, गडचांदूर - कोरपना तथा तालुक्यातील पोचमार्गाचे डांबरीकरण करणे, कापसाला सहा हजार रुपये भाव जाहीर करावा, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कापूस, सोयाबिन, धान पिकाची नुकसान भरपाई द्यावी, भोयगाव-गडचांदूर मार्गावर विद्यार्थ्यांसाठी एस.टी. बस सुरू करावी आदी मागण्या करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या यशासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी सुरू केली असून आंदोलनात दोन हजाराहून अधिक नागरिक उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. रस्त्याची समस्या ही प्रत्येकाची समस्या असून या आंदोलनात तालुक्यातील जनतेनी सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे तालुका सचिव अरुण रागीट, उपसरपंच मोरेश्वर आस्वले, सहसचिव चंदू चटप, शांताराम पानघाटे, नरेश सातपुते, अनिल चटप, गजानन पंधरे, विलास आगलावे, अरुण काळे, शिवाजी बोढे, राजेंद्र पावडे, मुमताजभाई, पटकोटवार, लटारी ताजने, सुधाकर कुसराम, संतोष बोबाटे, भास्कर जोगी आदींनी केले आहे. (वार्ताहर)
भजन मंडळे होणार सहभागी
आंदोलनात कवठाळा, तळोधी, बाखर्डी, लखमापूर, पिंपळगाव आदी गावातील भजने मंडळे सहभागी होणार आहे. भजनाद्वारे घंटानाद करून शासन व लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होणार आहे. यात महिलांची भजने मंडळेही सहभागी होणार असल्याचे आयोजकाचे म्हणणे आहे.
आंदोलनासाठी कार्यकर्त्यांच्या गावात भेटी
रस्ता रोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गावागावात जावून आंदोलनाची माहिती देत आहे. ‘आता खाऊ नका गस्ता झालाच पाहिजे रस्ता ’ असे सांगत लोकांनी पत्रकांचे वाटप करीत आहे. तर गावागावात फलक लावणे सुरू आहे.