तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने प्रेमीयुगुलाचा विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:30 IST2021-04-28T04:30:41+5:302021-04-28T04:30:41+5:30

बल्लारपूर : दोघांची मने जुळली, परंतु घरच्यांचा विरोध मात्र कायम होता. यामुळे मार्ग काही सापडेना. शेवटी दोघांनीही हिंमत करून ...

Premyugula's marriage initiated by Tantamukta Samiti | तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने प्रेमीयुगुलाचा विवाह

तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने प्रेमीयुगुलाचा विवाह

बल्लारपूर : दोघांची मने जुळली, परंतु घरच्यांचा विरोध मात्र कायम होता. यामुळे मार्ग काही सापडेना. शेवटी दोघांनीही हिंमत करून आपल्या मनातील इच्छा मानोरा येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष साईनाथ ढोंगे यांना बोलून दाखविली व अर्ज सादर केला. त्यांच्या पुढाकाराने दोघांचा विवाह सर्वांच्या सहमतीने मानोराच्या महादेव देवस्थानात पार पडला.

यावेळी महादेव मंदिरात मानोरा येथील वर अंकुश भाऊजी दूधबळे यांची उपस्थिती होती तर वधू बल्लारपूरची होती. या सोहळ्यात मानोरा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष साईनाथ ढोंगे, ग्रामपंचायतीच्या सरपंच जीवनकला ढोंगे, उपसरपंच लहुजी टिकले, ग्रामपंचायत सदस्य ऋषी पिपरे, बंडू पिपरे, गुरुदेव बुरांडे, बंडू बुरांडे, रोशन अली सय्यद, गणपती बुरांडे यांनी दोघांचे वय पडताळून त्यांच्या सहमतीने दोघांचाही विवाह लावून आशीर्वाद दिला.

Web Title: Premyugula's marriage initiated by Tantamukta Samiti