गर्भवती महिलेवर डॉक्टरकडून अत्याचार

By Admin | Updated: July 13, 2016 01:50 IST2016-07-13T01:50:21+5:302016-07-13T01:50:21+5:30

तालुक्यातील शेगाव (बु.) येथील चाळीशी गाठलेल्या एका डॉक्टरने उपचाराकरिता आलेल्या एका २५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना...

Pregnant woman tortured by a doctor | गर्भवती महिलेवर डॉक्टरकडून अत्याचार

गर्भवती महिलेवर डॉक्टरकडून अत्याचार

शेगाव येथील घटना : डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्याला अटक
वरोरा/शेगाव : तालुक्यातील शेगाव (बु.) येथील चाळीशी गाठलेल्या एका डॉक्टरने उपचाराकरिता आलेल्या एका २५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपी डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
इस्माईल पठाण (४४) असे डॉक्टरचे तर अखिल शेख (२०) रा. शेगाव असे सहायकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, अखिल हा डॉक्टरचा भाचा आहे. शेगाव परिसरातील एक २५ वर्षीय महिला आपल्या पतीसह शेगाव (बु) येथील डॉक्टर इस्माईल पठाण याच्याकडे सोमवारी सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास उपचाराकरिता आली होती. डॉक्टर इस्माईल पठाण याने पीडितेला इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने आतल्या खोलीत नेवून खाटेवर झोपविले. तिच्या पतीला बाहेर थांबायला सांगून दार आतून बंद केले आणि त्या महिलेवर अतिप्रसंग केला.
हा प्रकार येथेच थांबला नाही. त्यानंतर डॉक्टरचा सहकारी असलेला त्याचा भाचा अखिल शेख यानेही पीडितेवर अत्याचार केला. घडलेल्या प्रकारामुळे महिला घाबरलेली होती. त्यामुळे लगेच तिने पतीला काहीही सांगितले नाही. मात्र परतीचा प्रवास करीत असताना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या पतीने त्यांच्या नातेवाईकांच्या कानावर ही बाब घातली. नातेवाईकांनी दोघांच्याही मनातील भीती दूर करुन पीडित दाम्पत्याला धीर दिल्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेगाव (बु.) येथील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टर व त्याच्या सहायकावर भांदवि कलम ३७६ (क) (ड) तसेच अट्रासिटी अक्टनुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. (प्रतिनिधी)

 

Web Title: Pregnant woman tortured by a doctor