प्रार्थना अॅल अॅनॉन महिला परिवाराचा वर्धापन दिन
By Admin | Updated: March 18, 2015 01:13 IST2015-03-18T01:13:46+5:302015-03-18T01:13:46+5:30
प्रार्थना अॅल अॅनान महिला परिवार समुहाचा पहिला वर्धापन दिन येथील न्यू इंग्लिश हायस्कुलच्या प्रांगणात शनिवारी पार पडला.

प्रार्थना अॅल अॅनॉन महिला परिवाराचा वर्धापन दिन
चंद्रपूर : प्रार्थना अॅल अॅनान महिला परिवार समुहाचा पहिला वर्धापन दिन येथील न्यू इंग्लिश हायस्कुलच्या प्रांगणात शनिवारी पार पडला. अॅल अॅनॉनच्या महिला शाखेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बालरोग तज्ज्ञ डॉ.एन.एन. जोशी आणि मुख्य अतिथी म्हणून प्रा. आरती यशवंत दाचेवार होत्या.
पाहुण्यांच्या स्वागतानंतर अॅल अॅनानच्या महिला सभासदांनी दारूच्या दुष्परिणामामुळे संपूर्ण कुटुंबाच्या दुर्दशेवर झालेल्या अनुभवांचे कथन केले. प्रा. आरती दाचेवार यांनी मद्यप्राश मुक्त समाज घडावा, असे सांगून महिलांनी कथन केलेल्या व्यथांना उजागर केले. मद्यप्राशन करणाऱ्याला कुटुंबाचे, घराचे समाजाचे भान राहत नाही. तो मद्याच्या आहारी जात नाही. त्याला मद्य पिण्याचा आजार होतो आणि त्याला वारंवारा दारू प्यावी लागते. अशा मद्यपींना या आजारातून काढण्याचा प्रयत्न ही महिला संघटना करीत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.जोशींनी दारूबंदीवर जोर दिला. ललिता, रजनी, भारती, सुनीता एन., शिल्पा एस., शरयू बी, सागरा पी, ज्योत्स्ना आर, नलिनी एल. यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)