चंद्रपूरच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी प्रवीण टाके रुजू
By Admin | Updated: March 16, 2017 00:44 IST2017-03-16T00:44:13+5:302017-03-16T00:44:13+5:30
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई येथे वरिष्ठ सहायक संचालक पदावरील प्रवीण टाके मंगळवारी चंद्रपुरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाची सुत्रे हाती घेतली.

चंद्रपूरच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी प्रवीण टाके रुजू
चंद्रपूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई येथे वरिष्ठ सहायक संचालक पदावरील प्रवीण टाके मंगळवारी चंद्रपुरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाची सुत्रे हाती घेतली.
प्रवीण टाके मंत्रालयात लोकराज्य मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून गेली तीन वर्ष कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी सहा वर्ष नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्र येथे जनसंपर्क अधिकारी या पदावर कार्य केले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात येण्यापूर्वी त्यांनी विविध दैनिकांमध्ये विविध पदावर नागपूर व अकोला येथे पत्रकारिता केली आहे.
नागपूर विद्यापीठ जनसंवाद विद्या विभागाच्या पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमाच्या प्रतिष्ठित वसंतराव ओगले पुरस्काराचे ते मानकरी असून स्नातकोत्तर पत्रकारिता अभ्यासक्रमात ते अमरावती विद्यापीठातील दुसरे मेरीट आहेत.
त्यांची फकीर ही चरित्र कांदबरी प्रकाशित असून सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला. यावेळी कार्यालयातील सर्व कर्मचारी वृध्दांनी पुस्पगुच्छ देवून स्वागत केले. (नगर प्रतिनिधी)