प्रकाश शर्मा यांचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: April 5, 2016 03:38 IST2016-04-05T03:38:00+5:302016-04-05T03:38:00+5:30
येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भिकमचंद शर्मा (६३ वर्षे) यांचा सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास रेल्वेने गंभीर जखमी

प्रकाश शर्मा यांचा अपघाती मृत्यू
चंद्रपूर : येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भिकमचंद शर्मा (६३ वर्षे) यांचा सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास रेल्वेने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. त्यांच्या पाकिटात सापडलेल्या चिठ्ठीत शारीरिक व्याधीने त्रस्त असल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असल्याने या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास बसस्थानकाजवळील रेल्वेच्या उड्डाण पुलालगत पोस्ट आॅफिसच्या बाजूच्या रेल्वे ट्रॅकवर ते जखमी अवस्थेत पडलेले आढळून आली. उड्डाण पुलावरून जाणाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर बरीच गर्दी जमली. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी ट्रॅकवरून उचलून त्यांना बाजूला केले. तेव्हा ते जिवंतच होते. मात्र त्यांना ओळखणारे गर्दीत कुणीही नसल्याने बराच काळपर्यंत ते तसेच पडून होते. रामनगर पोलिसांना या अपघाताबाबत कळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून जिल्हा सामान्य रूग्णालयात नेले. तोपर्यंत ते जिवंत होते. मात्र उपचारादरम्यान काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालविली. (जिल्हा प्रतिनिधी)
चिठ्ठीमुळे झाला खुलासा
४घटनास्थळी त्यांच्या खिशातील पाकिटात आढलेल्या चिठ्ठीत कान, कंबर आणि पाठदुखीच्या आजाराने आपण त्रस्त झालो असून आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही, त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख होता. या चिठ्ठीत त्यांचे दोन भाऊ, मुलगा आकाश आणि मुलगी मेघा यांचे मोबाईल क्रमांक लिहिलेले होते. त्यावरून पोलिसांनी संपर्क साधला.