‘लोकमत’ची लेखमाला स्तुत्य उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:44 IST2017-08-14T23:44:19+5:302017-08-14T23:44:56+5:30

यूपीएससी, एमपीएससी, बँकींग वा तत्सम स्पर्धा परीक्षांकरिता परीक्षार्थ्यांना जोराची तयारी करावी लागते, नियमित वाचन करुन त्यांना जून्या व नविन माहितीचे ज्ञान समृद्ध करावे लागते.

Praise of Lokmat's commendable venture | ‘लोकमत’ची लेखमाला स्तुत्य उपक्रम

‘लोकमत’ची लेखमाला स्तुत्य उपक्रम

ठळक मुद्देविपिन मुद्धा : लोकमतच्या स्पर्धेच्या जगात लेखमालेचे विमोचन

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : यूपीएससी, एमपीएससी, बँकींग वा तत्सम स्पर्धा परीक्षांकरिता परीक्षार्थ्यांना जोराची तयारी करावी लागते, नियमित वाचन करुन त्यांना जून्या व नविन माहितीचे ज्ञान समृद्ध करावे लागते. याकरिता, त्या संबंधातील पुस्तक-मासिक वाचल्याने फायदा होतोच, सोबतच वर्तमानपत्र नियमित वाचल्याने अधिक फायदा होतो. कारण, पुस्तकांमध्ये साचेबद्ध माहिती असते. तर वर्तमानपत्रातून चालू घडामोडी, राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांची माहिती मिळत असते. लोकमत’ने बातम्या व लेखासोबतच स्पर्धेच्या जगात ही मालिका सुरु करुन स्तुत्य कार्य हाती घेतले आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. असे प्रतिपादन बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपिन मुद्धा यांनी केले.
‘लोकमत’ने सुरु केलेल्या ‘स्पर्धेच्या जगता’ या मालिकेचे स्थानिक कला वाणिज्य महिला महाविद्यालयात विमोचन करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून मुद्धा बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे उपस्थित होते. मुख्याधिकारी मुद्धा यांनी, तुम्हाला पुढे काय व्हायचे आहे, असा थेट प्रश्न सुरु करुन विद्यार्थिनींना बोलते केले. यावेळी त्यांच्या अभ्यासक्रमापासून तर स्पर्धा परीक्षा कशी द्यायची याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
ध्येय ठेवा, ते प्राप्त करण्याकरिता प्रचंड मेहनत घेण्याची तयारी ठेवा, वाचन नियमित करा, वृत्तपत्र वाचाच असा आग्रह त्यांनी विद्यार्थिनींना केला. प्राचार्य शिंदे यांनीही लोकमतने सुरु केलेल्या लेखमालेची प्रशंसा केली, बाल मंच, युवा मंच, सखी मंच आणि आता विद्यार्थ्यांकरिता लोकमतने स्पर्धेच्या जगात हा मंच उभा केला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी अतिथी म्हणून विसापूर येथील चिंतामणी कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत दोंतुलवार यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक लोकमतचे तालुका प्रतिनिधी वसंत खेडेकर यांनी केले. संचालन प्रा. प्रमोद घ्यार यांनी तर आभार प्रा. सुहास शिवणकर यांनी मानले.

Web Title: Praise of Lokmat's commendable venture