दोन घरांवर वीज कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:14 IST2018-05-23T23:14:43+5:302018-05-23T23:14:53+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली येथील दोन घरावर वीज कोसळली. ही घटना बुधवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान घडली.

Power on two houses collapsed | दोन घरांवर वीज कोसळली

दोन घरांवर वीज कोसळली

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली येथील दोन घरावर वीज कोसळली. ही घटना बुधवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान घडली.
यात घराच्या भिंतीला तडे गेले असून गावातील इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. गोंडपिपरी तालुक्यात बुधवारला पहाटेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. तालुक्यातील सोमनपल्ली येथे पहाटे ३ वाजता दोन घरांवर वीज कोसळली. कवडू कुबडे, गंगाधर भोयर यांच्या घरावर वीज कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले. घराचा भिंतीला तडा गेल्या. घरावरील कवेलू फुटले. गावातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद झाली आहेत. या घटनेत कुठलीच जिवितहानी झालेली नाही.
म्हशींचा मृत्यू
कोरपना : तालुक्यातील ढोपटाळा गावातील अर्जुन मारोती बोबडे या शेतकºयांची जनावरे गावालगतच्या शेतात बांधून असताना अचानक वीज कोसळली. यात दोन म्हशींचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारच्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. सोमवारी पहाटेच्या सुमारास ढोपटाळा येथे वादळी पाऊस झाला.

Web Title: Power on two houses collapsed