मार्चमध्ये कमी होणार वीजदर
By Admin | Updated: February 23, 2015 01:16 IST2015-02-23T01:16:10+5:302015-02-23T01:16:10+5:30
वीज दरवाढीचा प्रस्ताव महावितरणने आयोगाकडे सादर केलेला असला तरी, मार्च महिन्यात सर्व वर्गवारीतील ग्राहकांचे वीजदर कमी होणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

मार्चमध्ये कमी होणार वीजदर
चंद्रपूर : वीज दरवाढीचा प्रस्ताव महावितरणने आयोगाकडे सादर केलेला असला तरी, मार्च महिन्यात सर्व वर्गवारीतील ग्राहकांचे वीजदर कमी होणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.
वसुलीची मुदत संपलेली असल्याने महानिर्मितीच्या दरापोटी लागू असलेली व अंतरिम आकाराची रक्कम मार्चच्या देयकामध्ये लागू होणार नाही. यामुळे सर्व वर्गवारीतील ग्राहकांना वीज बिलात दिलासा मिळणार आहे. सध्याच्या एक्सप्रेस फिडरवरील औद्योगिक ग्राहकांना प्रति युनिट दर ८.५९ रूपये ऐवजी ७.५९ रूपये आणि नॉन एक्सप्रेस फिडरवरील औद्योगिक ग्राहकांना प्रति युनिट दर ७.८२ रूपये ऐवजी ६.८८ रूपये हा दर लागू होणार आहे. घरगुती ग्राहकांचे दरही कमी होणार असून ० ते १०० युनिट वीज वापर असणाऱ्यांना ग्राहकांना प्रति युनिट ४.१६ पैसे ऐवजी ३.६५ पैसे आणि १०१ ते ३०० युनिट वीज वापर असणाऱ्यांना प्रति युनिट ७.३९ रूपयावरुन ६.५४ रूपये राहणार आहे. वाणिज्यिक ग्राहकांनाही याचा फायदा मिळणार आहे. त्यांना प्रति युनिट ९२ पैसे ते १.६३ पैसे या प्रमाणात दिलासा मिळणार आहे, असे महाविरणने कळविले आहे. महावितरणने नुकताच बहुवार्षिक दराचा प्रस्ताव आयोगाकडे सादर केला आहे. आयोगाकडे दिलेल्या प्रस्तावानुसार पूर्ण प्रस्ताव जशाचा तसा आयोग कधीही मंजूर करीत नाही, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)