वीज केंद्रात त्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्तीसह आंतवासिताची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:33 IST2021-09-24T04:33:23+5:302021-09-24T04:33:23+5:30
प्रमाणपत्र अभ्यासक्रम महाविद्यालयातर्फे राबविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या तांत्रिक समस्यांचे निराकरण करू शकतील, अशा महाविद्यालयाच्या ...

वीज केंद्रात त्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्तीसह आंतवासिताची संधी
प्रमाणपत्र अभ्यासक्रम महाविद्यालयातर्फे राबविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या तांत्रिक समस्यांचे निराकरण करू शकतील, अशा महाविद्यालयाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील हुशार विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकल्पांवर काम करण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे शिष्यवृत्तीसह आंतरवासिता दिली जाईल.
औष्णिक विद्युत केंद्र अभियांत्रिकी व विज्ञान क्षेत्रामध्ये आवश्यक गुणवत्ता सुनिश्चित करणारे कार्यक्रम रचणे, विकसित आणि वितरित करणे, ज्यामुळे उद्योग आवश्यकतांनुसार व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू होतील आणि इच्छुकांना रोजगारक्षम बनवता येईल. याबाबतची सूचना महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी केली होती.
दोन्ही संघटनांमधील सामान्य हितसंबंध आणि संबंधित उपक्रमांच्या क्षेत्रांवर चर्चा करून औष्णिक विद्युत केंद्र अभियांत्रिकी
व विज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण आणि कौशल्य विकासास प्रोत्साहन देण्यासाठी दीर्घकालीन सहकार्य करण्याचा
निर्णय घेतला आहे.
तसेच देशातील विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्याच्या
आवश्यकतेनुसार अभ्यासक्रम स्थापन करणे आणि शैक्षणिक क्षेत्रासह औद्योगिक क्षेत्रात जवळून कार्य करणे.
इंटर्नशिप आणि व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थी, इच्छुकांचे कौशल्य वाढवणे, अशी या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
महानिर्मितीच्या वतीने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे व राजीव गांधी
अभियांत्रिकी, संशोधन आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य नीरज नगराळे यांच्यात सामंजस्य कराराचे
हस्तांतरण करण्यात आले. या प्रसंगी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता (प्रशासन) आर.के. ओसवाल, कार्यकारी अभियंता
अरुणा भेंडेकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजकुमार गिमेकर व राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन आणि तंत्रज्ञान
महाविद्यालयाचे प्राध्यापक बलबीरसिंग गुरन प्रामुख्याने उपस्थित होते.
230921\23cpr_2_23092021_32.jpg
सामंजस्य करार करताना वीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे व मान्यवर.