वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:18 IST2019-01-07T23:18:28+5:302019-01-07T23:18:42+5:30
वीज कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी एकदिवसीय संप पुकारला.

वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांचा संप
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वीज कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी एकदिवसीय संप पुकारला.
महापारेषण कंपनीतील स्टाफ सेटअप लागू करताना आधीची एकूण मंजूर पदे कमी न करता अमलात आणावे, महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुर्नरचना संघटनांनी सूचनवलेल्या सूचनांचा अंतर्भाव करावा. खासगीकरण व फ्रॅन्चाईसी करण्याचे धोरण थांबवावे. महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रातील लघु जल विद्युत निर्मित संचाचे शासनाने अधिग्रहण न करता महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रातच कार्यरत ठेवावे. महानिर्मिती कंपनीच्या २१० मे. वॅटचे संच बंद करण्याचे धोरण थांबवावे, जुन्या पेंशन योजनेच्या धर्तीवरील पेंशन योजना लागू करावी, तिनही कंपनीतील रिक्त पदे तातडीने भरावे, यासाठी वीज कर्मचाºयांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. दरम्यान, किशोर जोरगेवार यांनी वीज कामगारांची भेट घेऊन संपाला पाठींबा दिला. कामगारांच्या समस्या सोडण्याची मागणीही त्यांनी केली.