दारिद्र्याने केला सानिकाच्या स्वप्नांचा चुराडा

By Admin | Updated: March 12, 2017 01:28 IST2017-03-12T01:28:27+5:302017-03-12T01:28:27+5:30

घरच्या गरिबीने स्थानिक आझाद वार्डातील बालकलावंत सानिका पाचभाई हिचे चित्रपट बालअभिनेत्री बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

Poverty of Sanika's Dreams | दारिद्र्याने केला सानिकाच्या स्वप्नांचा चुराडा

दारिद्र्याने केला सानिकाच्या स्वप्नांचा चुराडा

दोन बहिणींना राज्यस्तरीय पुरस्कार : ‘कट्यार काळजात घुसली’मध्ये थोरल्या बहिणीची निवड
आशिष घुमे  वरोरा
घरच्या गरिबीने स्थानिक आझाद वार्डातील बालकलावंत सानिका पाचभाई हिचे चित्रपट बालअभिनेत्री बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. या बालिकेची निवड गाजलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटासाठी झाली होती. प्रत्यक्षात या चित्रपटाच्या शुटिंगकरिता सातारा-सांगली येथे न पोहोचल्याने हा चित्रपट तिच्या हातातून गेला.
आझाद वार्डातील सुगंधा पाचभाई यांना सानिया , देवयानी व प्रतिक असे तीन अपत्ये असून ते अरविंद विद्या निकेतन संस्थामध्ये शिक्षण घेत आहते. सानिका व देवयानी यांनी नृत्यासंस्थेतून नृत्याचे धडे गिरवणे सुरु केले. अनेक नृत्यस्पर्धांमध्ये सहभागी होऊन त्यांनी कलागुणांचे प्रदर्शन केले. त्यांची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली. पुणे , मुंबई, नांदेड येथील नृत्य स्पर्धेत दोघीही अव्वल ठरल्या. त्यानंतर थोरली सानिकाची ‘कट्यार काळजात घुसली’, या चित्रपटात बालकलावंत म्हणून निवड झाली होती. त्याच्या शुटिंगकरिता सातारा व सांगली येथे बोलविण्यात आले. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तेथे पोहचू शकली नाही.
सुगंधा पाचभाई पतीच्या सुखाविना धैर्याने जीवन जगत मुलांच्या शिक्षणासह संसारिक गाडा चालबित आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणताही स्थायी आर्थिक स्रोत नाही. त्या मजुरीतून मिळणाऱ्या मोबदल्यावर मुली व मुलांचा सांभाळ करीत आहेत. त्या आझाद वार्डात किरायाच्या छोट्याशा खोलीत राहतात. त्यांची मुली- मुले हुशार असून त्याच्यात कला, गुण, कौशल्याचा ठेवा आहे. सानिका व देवयानी पुणे , मुंबई, नांदेड येथील स्पर्धांमध्ये यशस्वी ठरल्या. त्यात सानिकाला राज्यातून तिसरा क्रमांक मिळाला. राज्यस्तरीय पुरस्कारांनी दोन्ही बहिणी सन्मानित झाल्या आहे.

सानिकाला आर्थिक परिस्थितीचा अडसर
नृत्यकलावंत सानिका व देवयानी याच्यात असलेले सुप्तगुण डोळे दीपवणारे आहेत. मात्र दिवसभर काबाडकष्ट करून मिळवलेल्या मजुरीतून आपल्या मुलांना अन्नाचा घास भरवणारी आई सुगंधा कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाच्या आदराविना हलाखीचे जीवन कंठीत आहे. सुगंधाबाई आपल्या परिस्थितीबाबत इतरांशी सवाद साधतात तेव्हा सानिका व देवयानीच्या डोळ्यातून अश्रू ढळू लागतात. या कलावंत असणाऱ्या सानिया व देवयानी यांना शिक्षण संस्थाचालकांनी अथवा सामाजिक संघटनांनी पुढे येऊन त्याच्या उज्वल भवितव्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे.

Web Title: Poverty of Sanika's Dreams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.