गरीब विद्यार्थ्यांना घेतले दत्तक

By Admin | Updated: July 20, 2015 00:49 IST2015-07-20T00:49:13+5:302015-07-20T00:49:13+5:30

पंजाबी समाज सेवा समितीच्या सभागृहात पंजाबी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवारी आयोजित करण्यात आला.

Poor students adopted | गरीब विद्यार्थ्यांना घेतले दत्तक

गरीब विद्यार्थ्यांना घेतले दत्तक

चंद्रपूर: पंजाबी समाज सेवा समितीच्या सभागृहात पंजाबी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवारी आयोजित करण्यात आला. यावेळी पाच उत्कृष्ट नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सहा गरीब विद्यार्थ्यांना पंजाबी समाज सेवा समितीच्या वतीने दत्तक घेण्यात आले.
सत्कारमूर्ती नगरसेवकांमध्ये संतोष लहामगे, नंदू नागरकर, संदीप आवारी, संजय वैद्य व अंजली घोटेकर यांचा समावेश होता. सन्मानचिन्ह तथा प्रशस्तीपत्र देऊन महापौर राखी कंचर्लावार आणि पंजाबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष पी. एम. साहनी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार नाना शामकुळे, तथा प्राचार्य कीर्तिवर्धन दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आला. सहा विद्यार्थ्यांनो दत्तक घेण्यात आले. त्यांचे शिक्षण, कपडे तथा अन्य खर्च पंजाबी समाज सेवा समितीच्या वतीने करण्यात येईल. आमदार नाना शामकुळे आपल्या आमदार निधीतून सहा कॉम्प्युटर देण्याची घोषणा केली.
यावेळी समाजाचे अध्यक्ष पी.एम. सहानी, माजी अध्यक्ष किशन चढ्ढा, सचिव सुरेश शर्मा, अ‍ॅड. भगवान पाटील, विनोद कत्याल, सचिव गौरव खोसला उपस्थित होते. संचालन सुरेश शर्मा यांनी केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Poor students adopted