गरिबांचे जगणे झाले सुकर
By Admin | Updated: May 21, 2015 01:21 IST2015-05-21T01:21:54+5:302015-05-21T01:21:54+5:30
उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्यावर मृत्यूला जवळ करण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे ...

गरिबांचे जगणे झाले सुकर
रुग्णांसाठी वरदान : राजीव गांधी जीवनदायी योजना
राजकुमार चुनारकर खडसंगी
उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्यावर मृत्यूला जवळ करण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील गरीब दारिद्र्यरेषेखालील अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहे. या योजनेत शासन करोडो रुपये खर्च करीत आहे. या योजनेत काही त्रुट्या असल्यातरी या योजनेचा गोरगरीब रुग्णांना फायदा होत असल्याने योजनेने जिल्ह्यातील गरिबांचे जगणे सूकर केले आहे.
दोन वर्षाअगोदर काँग्रेस सरकारने राज्यात सर्वप्रथम रायगड, सोलापूर, नांदेड, गडचिरोली, मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यात ही योजना सुरु केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २७ जिल्ह्यात २० नोव्हेंबर २०१३ पासून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या रुग्णालयात रुग्णावर उपचार केला जातो. या योजनेमध्ये नॅशनल ईन्सुरन्स कंपनीकडून रुग्णालयाला रक्कम देण्यात येते. त्यामुळे या कंपनीचेसुद्धा योगदान आहे. या योजनेमधून कुटुंबातील एकाला दीड लाख रुपये खर्च देण्यात येतो. या व्यतिरिक्त कीडनी प्रत्यारोपनासाठी अडीच लाखांची तरतूद राज्य शासनाने केली आहे.
राजीव गांधी जीवनदायी योजनेत ९७१ विविध आजारावर उपचार करता येतात. कार्डीयाल (हृदयरोग, हृदयविकार), कीडनी (मुत्रपींड), स्त्रीयांचे आजार, फुफ्फुस आदी मोठ्या आजारांचा यात समावेश आहे. कॅन्सर, कीडनी स्टोन, मेंदू हाडाचे विकार, भाजून जखमी, डोळ्यांचे विकार, लहान मुलांचे उपचार अशा आजाराचा या योजनेत समावेश आहे. जिल्ह्यात राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजनेअंतर्गतत चिमूर उपजिल्हा रुग्णालयामार्फत अंगणवाडी व शाळामधील शुन्य ते अठरा वयोगटातील सन २०१३-१४ व १४-१५ या वर्षात ४१ विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये हृदय शस्त्रक्रिया- १३, हर्निया- १०, तिरळेपना- ३, दुंभगलेले ओठ- २, जन्मजात मोतीबिंदू ४, हायट्रोसीअल- ३, गाठीचे ५, आयडेन्डेटेस्ट- १ या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.