वर्धा नदीवरील मुंगोली पुलाची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST2021-07-18T04:20:36+5:302021-07-18T04:20:36+5:30
घुग्घुस : वर्धा नदीवरील मुंगोली पुलावरून ८ मे रोजी मुंगोली -पैनगंगा कोळसा खाणीतून घुग्घुसकडे कोळसा घेऊन येणारा ...

वर्धा नदीवरील मुंगोली पुलाची दयनीय अवस्था
घुग्घुस : वर्धा नदीवरील मुंगोली पुलावरून ८ मे रोजी मुंगोली -पैनगंगा कोळसा खाणीतून घुग्घुसकडे कोळसा घेऊन येणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळला होता. या घटनेला दोन महिने होऊनसुद्धा पुलाला नव्याने कठडे बसण्यात आले नाही. पुलावरील रस्त्यावर खड्डे पडून सळाखी बाहेर निघाल्याने वाहनचालकाच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
संबंधित विभागाने दखल घेऊन कठडे बसविण्याबरोबर पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वकोली कामगारांकडून करण्यात येत आहे. वर्धा नदीवरील धानोरा व बेलोरा पुलाचे बेरिंग व मायको क्राॅंक्रेटिंग सार्वजनिक बांधकाम विभागाने केले. पूल दुरुस्तीच्या कामाची जबाबदारी वेकोलीकडे आहे. वेकोली दुर्लक्ष करीत असल्याने मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. वेकोली वणी क्षेत्राने नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर वाहने हळू चालवावी, असे फलक लावलेले आहेत. तरीही पुलावरून भरधाव वाहतूक होत आहे.