नागभीड पत्रकार संघातर्फे पूनम बगमारे यांचा सत्कार

By Admin | Updated: May 21, 2016 00:59 IST2016-05-21T00:59:53+5:302016-05-21T00:59:53+5:30

नागभीड पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती पूनम पुरुषोत्तम बगमारे यांचा नागभीड तालुका प्रादेशिक पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी सत्कार करण्यात आला.

Poonam Babamare felicitated by Nagbhid Press Association | नागभीड पत्रकार संघातर्फे पूनम बगमारे यांचा सत्कार

नागभीड पत्रकार संघातर्फे पूनम बगमारे यांचा सत्कार

नागभीड : नागभीड पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती पूनम पुरुषोत्तम बगमारे यांचा नागभीड तालुका प्रादेशिक पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी सत्कार करण्यात आला.
येथील पंचायत समितीमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसभापती मंदा पेंदाम होत्या. पाहार्णीचे माजी सरपंच पुरुषोत्तम बगमारे, अमोल वानखेडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर श्रीरामे, उपाध्यक्ष पुंडलीक निनावे, सचिव अरुण गायकवाड, घनश्याम नवघडे, विलास बहेकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रारंभी सुधाकर श्रीरामे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार व पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य पुंडलिक निनावे यांच्या हस्ते सभापती पूनम बगमारे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मधुकर बावनकर, होमराज गायकवाड, मेंढे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Poonam Babamare felicitated by Nagbhid Press Association