तलाव, नदी परिसर स्वच्छ

By Admin | Updated: September 10, 2016 00:52 IST2016-09-10T00:52:41+5:302016-09-10T00:52:41+5:30

जिल्हाभरात ५ सप्टेंबरला गणरायाची स्थापना मोठ्या हर्षोउल्हासात करण्यात आली.

Pond, river campus clean | तलाव, नदी परिसर स्वच्छ

तलाव, नदी परिसर स्वच्छ

जनजागृती : ठिकठिकाणी कृत्रिम तलावांचीही व्यवस्था
चंद्रपूर : जिल्हाभरात ५ सप्टेंबरला गणरायाची स्थापना मोठ्या हर्षोउल्हासात करण्यात आली. चंद्रपूर शहरात सुमारे साडेतीनशे सार्वजिनक गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. यासोबत हजारो नागरिकांनीही श्रींची स्थापना केली आहे. गणपतीस्थापनेच्या दुसऱ्या दिवशीपासून विसर्जनाला सुरूवात झाली आहे. मात्र यावेळी जलप्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी निर्माल्य कुंड व कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. यासोबत इरई नदी घाट व रामाळा तलावाचा तटही स्वच्छ केला असून पोलीस विभाग व जिल्हा प्रशासन सातत्याने विसर्जनव्यवस्थेकडे लक्ष ठेवून आहेत.
६ सप्टेंबरपासूनच घरघुती गणपतीचे विसर्जन करण्यात येत आहे. गणपती विसर्जनाच्या तयारीसाठी चंद्रपूर महानगरपालिका, पोलीस विभाग सज्ज झाला आहे. यावेळी जलप्रदूषण टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. मनपाच्या वतीने २० ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे तर चौकाचौकात निर्माल्य कुंड उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवाय सात ठिकाणी मार्गदर्शक मचानी उभारण्यात येणार आहेत. तसेच पोलीस विभागाने विसर्जनस्थळी तात्पुरती चौकी स्थापन केली आहे.
चंद्रपूर शहरातील गणपतीचे विसर्जन मुख्यत: रामाळा तलाव, इरई नदीवर केले जाते. गणपतीचे विसर्जन केल्यानंतर या ठिकाणी अस्वच्छता निर्माण होते. मूर्तीचे सांगाडे, माती, रासायनिक रंग, निर्माल्य, यामुळे नदी व तलावातील पाणी प्रदूषित होते. याचा फटका जलचर प्राण्यांनाही बसतो. या यंदा हा प्रकार टाळण्यासाठी मनपातर्फे पूर्वतयारी करण्यात आली आहे. मनपाच्या वतीने तलावाची व्यवस्थित स्वच्छता केली आहे. तलावात उतरण्यासाठी असलेल्या ओट्याचीसुद्वा व्यवस्थित स्वच्छता केली आहे. तलावाच्या शेजारीच निर्माल्य कुंड व कुत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. तलाव भोवती बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. भक्तासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलीस विभागाने विसर्जनाच्या वेळेस शांतता व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी तलावाच्या शेजारी पोलीस चौकी निर्माण केली असून या ठिकाणी पोलीस शिपाई दिवसभर तैनात असतात.
विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने या ठिकाणी नियंत्रण व मार्गदर्शनपर मचानी उभारण्यात आल्या आहेत. तसेच विसर्जनाच्या वेळीस मच्छिमार संस्था, सरदार पटेल महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांचेसुद्धा सहकार्य लाभणार आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आपातकालीन व्यवस्थाही करण्यात आली आहे.

Web Title: Pond, river campus clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.