पोंभुर्णा पं. स.ला विभागीय यशवंत पंचायतराज पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:52 IST2021-03-13T04:52:29+5:302021-03-13T04:52:29+5:30

: विकासाभिमुख कार्याचा शासनाकडून गौरव घोसरी : महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील आदर्श पंचायत राज ...

Pombhurna Pt. Divisional Yashwant Panchayat Raj Award to S. | पोंभुर्णा पं. स.ला विभागीय यशवंत पंचायतराज पुरस्कार

पोंभुर्णा पं. स.ला विभागीय यशवंत पंचायतराज पुरस्कार

: विकासाभिमुख कार्याचा शासनाकडून गौरव

घोसरी : महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील आदर्श पंचायत राज संस्थेची संकल्पना साकार व्हावी व त्यांचे बळकटीकरण व्हावे या हेतूने ग्रामविकास विभागाकडून राज्यस्तरावर पंचायतराज पुरस्कार प्रदान करण्यात येत असून, लोकाभिमुख कार्य करणारी पोंभुर्णा पंचायत समिती यशवंत पंचायत राज अभियानात नागपूर विभागात उत्कृष्ट कार्य म्हणून द्वितीय पुरस्कारास पात्र ठरलेली आहे.

विशेषतः जिल्ह्यातील पहिली आयएसओ नामांकित ही पंचायत समिती असून, सदर पुरस्काराने तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. पोंभुर्णा पंचायत समातीने सन २०१९-२० या सत्रात अधिकाअधिक लोकाभिमुख कार्य मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, पं. स. सभापती अलका आत्राम, गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. या पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायत घाटकुळला महाराष्ट्र राज्यात आदर्श गाव म्हणून पुरस्कार प्राप्त झाला असून, नुकतेच जिल्हा स्मार्ट व सुंदर ग्राम पुरस्काराने सन्मानित झाले आहे, तसेच ग्रामपंचायत आष्टा पंचायत सशक्तीकरण अभियानात देशात अव्वल आले. तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत पेपरलेस झाल्या असून, ११ ग्रामपंचायती व ७४ अंगणवाडी केंद्रांंना आय.एस.ओ. मानांकन मिळाले आहे. पारदर्शी प्रशासनाचे हे निकष आहेत. पोषण चळवळ उत्कृष्ट राबविल्याने कुपोषणमुक्त तालुका होण्याचे चित्र आहे.

नरेगा व स्वच्छ भारत मिशनअंतर्गत झालेली कामे ग्रामीण विकासाला दिशादर्शक ठरली आहेत. पंचायत समिती स्तरावर सीसीटीव्ही कॅमेरे, शुद्धजल, अभ्यागत कक्ष, स्वच्छता संदेश, योजना फलक निर्माण करण्यात आल्याने ग्रामीण नागरिकांना दिलासा मिळत आहे. आक्षेपपूर्ती प्रमाणसुद्धा ८० टक्के प्रमाणात आहे. जनतेत जागृती व्हावी हा हेतू ठेवून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’वर आधारित संदेशात्मक ‘आरोग्यावर बोलू काही’ पुस्तक प्रकाशित करणारी महाराष्ट्रातील पहिली पंचायत समिती ठरली आहे.

कोट

या अभियानात जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी, शिक्षकवर्ग, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, ग्रा.पं. कर्मचारी, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी होऊन सर्वतोपरी सहकार्य केल्याने पंचायत राज अभियानात गौरवाची मानकरी ही पंचायत समिती ठरली आहे.

- धनंजय साळवे, गटविकास अधिकारी पोंभुर्णा.

Web Title: Pombhurna Pt. Divisional Yashwant Panchayat Raj Award to S.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.