मूल तालुक्यात ३५ ग्रामपचायतींसाठी १०९ बुथवर मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:14 IST2021-01-13T05:14:01+5:302021-01-13T05:14:01+5:30
गावागावात शांतता राहावी, यासाठी मूल पोलीस ठाण्याच्या माध्यमातून नांदगांव, जुनासुर्ला, हळदी, राजोली आणि भादुर्णी येथे माॅकड्रील घेण्यात आली. ...

मूल तालुक्यात ३५ ग्रामपचायतींसाठी १०९ बुथवर मतदान
गावागावात शांतता राहावी, यासाठी मूल पोलीस ठाण्याच्या माध्यमातून नांदगांव, जुनासुर्ला, हळदी, राजोली आणि भादुर्णी येथे माॅकड्रील घेण्यात आली. मूल तालुक्यात भाजपा, काॅंग्रेस, शिवसेनेसह, वंचित बहुजन आघाडीनेही आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहे. भाजपाच्या तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले गावोगावी प्रचारसभा, बैठका घेत आहेत. तर काँग्रेसकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संतोष रावत यांनीही प्रचाराची धुरा सांभाळली आहे. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन येरोजवार यांनीही या प्रचारात उडी घेतली आहे. मूल तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी कुठे सरळ, तर कुठे तिहेरी लढतीचे चित्र आहे. तालुक्यातील राजोली, नांदगांव, जानाळा, सुशी, मारोडा, टेकाडी, डोंगरगाव, भादूर्णी, चिखली, चिचाळा या गावातील निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.