शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

राजकारण्यांना लागले आरक्षणाचे डोहाळे

By admin | Updated: September 27, 2016 00:50 IST

मूल नगरपालिकेच्या नगरसेवक व नगराध्यक्षाची निवडणूक १६ डिसेंबरला होत आहे. प्रभागातील नगरसेवकपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.

नगरसेवकांचे आरक्षण झाले : आता नगराध्यक्षाची प्रतीक्षाभोजराज गोवर्धन मूलमूल नगरपालिकेच्या नगरसेवक व नगराध्यक्षाची निवडणूक १६ डिसेंबरला होत आहे. प्रभागातील नगरसेवकपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र नगराध्यक्षपदाचे आरक्षण अजूननही घोषित झालेले नाही. यंदा नगराध्यक्षपदासाठी उभे राहणाऱ्या उमेदवाराला थेट जनतेशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळेच राजकारण्यांना आरक्षणाचे डोहाळे लागले आहेत.जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तसतसे निवडणुकीचे वातावरणही तापू लागले आहे. निवडणुकीची तारीख जाहिर झाली आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावले. आतापर्यंत प्रभागातील अर्धेअधिक कार्यकर्ते ‘उमेदवारी मलाच मिळेल’, या आशेवर कामालाही लागले. मूल नगरपालिकेत भाजपाचे वर्चस्व आहे. मात्र यंदा भाजपाच्या अनेक नगरसेवकांवर मूलवासी नाराज आहे. त्यामुळे फायदा काँग्रेस, राकाँला होवू शकतो. नगरपालिकेची निवडणूक काँग्रेस नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे काँग्रेस सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले नशिब आजमाविण्याचा प्रयत्न चालविला आहे. ते आतापासूनच नवीन चेहरे शोधताना दिसून येत आहेत. केंद्र व राज्यात, जिल्हा परिषद, नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. काम करताना भाजपाला विशेष अडचण येत नाही. त्यामुळे यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडून निवडणूक लढविण्यासाठी अनेक नवीन चेहरे समोर येत आहेत. त्यामुळे उमेदवारी द्यायची कोणाला, हाही प्रश्न भाजपा नेत्यांसमोर आहे. पक्षात तन-मन-धनाने काम करणाऱ्या खंद्या कार्यकर्त्यांनाही नाराज करू शकत नाही आणि मोजकीच उमेदवारी द्यायची असल्यामुळे कोणाची निवड करावी, हा विचार करणे आवश्यक आहे. १७ सदस्यीय मूल नगरपालिकेची निवडणूक ८ डिसेंबर २०११ रोजी पार पडली होती. त्यावेळी भाजपाचे ९, काँग्रेस ३, राकाँ २ आणि अपक्ष ३ असे सदस्यीय बलाबल होते. मात्र १६ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या मूल नगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला, किती नगरसेवक निवडून आणता येतील, हे येणारा काळच सांगेल. असे असतानाही जोपर्यंत मूल नगरपालिकेच्या नगराध्यक्षाचे आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत खऱ्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार नाही.सुधीर मुनगंटीवारांच्या कामाची चर्चानामदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या गृहक्षेत्रातील मूल शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला आहे. दोन वर्षांत मूल शहराचा चेहरामोहरा बदलला, हे सर्वसामान्यानाही दिसून येते. त्यामुळेच ना. मुनगंटीवार यांच्या विकासकामांवर मूलची जनता समाधानी आहे. त्यामुळे भाजपाला यंदाची निवडणूक जास्त जड जाईल, असे वाटत नसल्याचे जाणकारांचे मत आहे.