शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

राजकारणाचा घेतलेला वसा समर्पित जनसेवेसाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:08 IST

सरकारने जनसामान्यांच्या सर्वांगिण विकासासाठी लोकापयोगी योजना सुरू केल्या आहेत. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल, पोंभुर्णा व बल्लारपूर तालुक्यात आपण विकासाचा ठसा निर्माण केला आहे. निराधारांना सन्मानाने जगता यावे म्हणून अनुदानात वाढ केली. दिव्यांगाप्रती आपुलकी जोपासली. याचे आपण साक्षीदार आहात.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : विसापूर येथील नेत्रचिकित्सा शिबिरात दोन हजार रूग्णांची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : सरकारने जनसामान्यांच्या सर्वांगिण विकासासाठी लोकापयोगी योजना सुरू केल्या आहेत. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल, पोंभुर्णा व बल्लारपूर तालुक्यात आपण विकासाचा ठसा निर्माण केला आहे. निराधारांना सन्मानाने जगता यावे म्हणून अनुदानात वाढ केली. दिव्यांगाप्रती आपुलकी जोपासली. याचे आपण साक्षीदार आहात. गरजूंना आरोग्य सेवा मिळावी, सुलभपणे नेत्रचिकित्सा करता यावी, म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासून शिबिरे घेतली. आपला राजकारणाचा वसा समर्पित जनसेवासाठीच आहे, असे उद्गार राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.विसापूर येथील श्री पंढरीनाथ देवस्थान मंगल कार्यालयाच्या प्रागंणात श्री माता कन्यका सेवा संस्थेच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून महाराष्टÑ विकास महामंडळाच्या स्थानिक विकास निधीतून नेत्रचिकित्सा शिबिर पार पडले. यावेळी ते नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते. उद्घाटन सामारंभाला भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, भाजपाचे जिल्हा महासचिव प्रमोद कडू, बल्लारपूर पंचायत समिती सभापती गोविंदा पोडे, जि. प. सदस्य अ‍ॅड. हरिश गेडाम, पं. स. सदस्य विद्या गेडाम, रमेश पिपरे, माजी जि. प. सदस्य मनोहर देऊ ळकर, तंमुस अध्यक्ष दिलीप खैरकर, विजय गिरडकर, अशोक भोयर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद ठाकूर, सुरखा इटनकर, उज्वल धामनगे आदी उपस्थित होते.नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये दोन हजार नेत्ररूग्णांनी तपासणीसाठी नोंद केली. यावेळी ध्वनीमुद्रीत माध्यमाच्या माध्यमातून नागरिकांशी पालकमंत्री यांनी संवाद साधला.पालकमंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, आपल्या राजकीय वाटचालीत आजतागायत नेत्रचिकित्सा शिबिराच्या माध्यमातून १० हजारावर नेत्र रूग्णांवर मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली. दिव्यांगाना मोफत सायकलचे वितरण केले. विकासकामासोबत सामाजिक भावनेतून कौशल्य विकास साधण्यासाठी व रोजगाराभिमुख करण्यासाठी बांबू प्रशिक्षण केंद्र, डायमंड कटिंग प्रशिक्षण केंद्र व महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. सबका साथ, सबका विकास हेच ध्येय बाळगले, असे त्यांनी संवाद साधताना म्हटले.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुरज टोमटे यांनी केले.२५० शस्त्रक्रियेसाठी पात्रतज्ज्ञ नेत्र चिकित्सकाच्या माध्यमातून पुरूष नेत्ररूग्णांची तपासणी जि. प. शाळेच्या कक्षात तर महिला नेत्र रूग्णाची तपासणी मंगल कार्यालयाच्या कक्षात करण्यात आली. यामध्ये २५० च्या आसपास नेत्र, रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.