तंटामुक्त समितीला राजकारण अडसर
By Admin | Updated: October 6, 2014 23:10 IST2014-10-06T23:10:57+5:302014-10-06T23:10:57+5:30
१५ आॅक्टोबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय कार्यकर्ते आपलाच उमेदवार

तंटामुक्त समितीला राजकारण अडसर
हरदोना : १५ आॅक्टोबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय कार्यकर्ते आपलाच उमेदवार कसा सरस आहे. हे गावातील नागरिकांना पटवून देत आहे. उमेदवारही मतदार राजापर्यंत ‘डोअर टू डोअर’ प्रचार करीत आहे. मात्र गावात शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी राजकारण आणि दारू तंटामुक्त समितीला अडसर ठरत आहे.
विधानसभा निवडणूकांचा सावत्रिक कार्यक्रम जाहिर झाल्यापासून निवडणुकांचे पडघम वाजयला सुरुवात झाली. सर्वच राजकीय पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी गणित जुळवित आहे.
निवडणूक आठवड्याभरावर आली आहे. उमेदवारांना मतदार राजापर्यंत पोहचायला मोठी कसरत करावी लागत आहे. यावेळी राजकीय पक्षांकडून मतदारांना विविध आमिष दाखवून आपलेसे करण्यात राजकीय कार्यकर्ते गुंतले आहे. पाच वर्षात कधी गावात न पोहचलेले उमेदवार आता मतदारांच्या घरापर्यंत पोहचत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष, कार्यकर्ते सकाळपासूनच गावात फिरत आहे.
गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणूक काळात तंटामुक्त गाव समित्यांना सक्रिय राहणे गरजेचे आहे. निवडणुकी दरम्यान गावातील शांततेचा सारीपाट बदलत असतो. गावागावात राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. अनेक जण पूर्णवेळ प्रचारात गुंतले आहे. असले तरी मतदार राजानी आता सावध राहणे तेवढेच गरजेचे आहे.
निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मतदारांना आपले करण्यासाठी राजकीय कार्यकर्ते कामाला लागले आहे. अनेकांनी आमिषेही दाखविले आहे. मतदारांना भूल पाडण्यासाठी अनेक मार्ग शोधण्यात कार्यकर्ते मग्न आहे. त्यामुळे काही राजकीय कार्यकर्त्यांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तंटामुक्त गाव समितीला कोणतेही राजकीय वलय न लागता कोणताही निर्णय घेतात दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.
गावागावातील तंटामुक्त गाव समित्यांनी निवडणूक काळात सक्रिय राहण्याची गरज सध्या आहे. निवडणूकीदरम्यान गावातील राजकारण आणि दारू तंटामुक्त समितीला अडसर ठरु शकते.
गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम आता खऱ्या अर्थाने तंटामुक्त समित्यांकडे आले आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीने कोणत्याही आमिषाला बळी न पडता गावात काम करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)