बल्लारपूर तालुक्यात ९ हजार ८९७ बालकांना पोलिओ लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST2021-02-05T07:34:29+5:302021-02-05T07:34:29+5:30

बल्लारपूर : तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत ग्रामीण भागातील ११२.६१ टक्के, शून्य ते पाच वर्षे वयोगटातील २ हजार ...

Polio vaccination to 9 thousand 897 children in Ballarpur taluka | बल्लारपूर तालुक्यात ९ हजार ८९७ बालकांना पोलिओ लसीकरण

बल्लारपूर तालुक्यात ९ हजार ८९७ बालकांना पोलिओ लसीकरण

बल्लारपूर : तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत ग्रामीण भागातील ११२.६१ टक्के, शून्य ते पाच वर्षे वयोगटातील २ हजार ८५८ बालकांना पोलिओ लस देण्यात आली. बल्लारपूर शहरात ७ हजार ३९ बालकांना लस पाजण्यात आली.

बल्लारपूर नगर पालिका क्षेत्रातील ३२ वॉर्डात कामगारांच्या वस्त्या, रेल्वे स्थानक, बसस्थानक, वॉर्डावॉर्डात ५० बूथच्या माध्यमातून पोलिओ लसीकरण मोहिमेकरिता बल्लारपूर शहरात ४ मोबाईल टीम, ५ ट्राझिंट टीम, १३८ कर्मचारी, ५ सुपरवायझर, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर इत्यादींची टीम यांनी दिवसभरात ७ हजार ३९ पाच वर्षांखालील बालकांना लस पाजली, ग्रामीण विभागात विसापूर, कळमना, कोठारी या प्राथमिक स्वास्थ्य केंद्राच्या माध्यमातून ५९ बुथवर २ हजार ८५८ बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली. प्रत्यक्ष लाभार्थी २ हजार ५३८ होते. या मोहिमेसाठी १०६ कर्मचारी व १२ सुपरवायझर यांचे पथक या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होते.

Web Title: Polio vaccination to 9 thousand 897 children in Ballarpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.