केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते पोलिओ मोहिमेचा चंद्रपुरात शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:21 IST2018-03-11T23:21:51+5:302018-03-11T23:21:51+5:30
केंद्र सरकारने पोलीओ मुक्त भारताची हाक दिली असून पोलीआ ेमुक्तीचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्रीय तसेच विविध राज्यांच्या आरोग्य मंत्रालयाने पाऊले उचलली आहेत.

केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते पोलिओ मोहिमेचा चंद्रपुरात शुभारंभ
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : केंद्र सरकारने पोलीओ मुक्त भारताची हाक दिली असून पोलीआ ेमुक्तीचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्रीय तसेच विविध राज्यांच्या आरोग्य मंत्रालयाने पाऊले उचलली आहेत. पोलिओच्या निर्मूलनासाठी प्रभावी औषधांची उपलब्धता करीत पोलीओ उच्चाटनासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. या प्रयत्नांना सार्वजनिक स्तरावर प्रतिसादाची आवश्यकता आहे. त्यामुळे ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलीओ पाजून दुसरा टप्पा यशस्वी करावा, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
११ मार्च रविवारला पल्स पोलीओ अभियानाच्या दुसºया टप्प्याचा शुभारंभ केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते दे. गो. तुकूम येथील नागरी आरोग्य केंद्रात बालकाला पोलीओ डोज पाजून करण्यात आला.
यावेळी आ. नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास उपमहापौर अनिल फुलझेले, नगरसेवक संदीप आवारी, नगरसेविका पुष्पा उराडे, नगरसेविका शितल गुरुनुले, नगरसेविका माया उईके, नगरसेविका शिला चव्हाण, नगरसेवक सोपान वायकर, तुकूम भाजप मंडल अध्यक्ष प्रमोद शास्त्रकार, श्रीकांत भोयर यांच्यासह आरोग्य केंद्रातील बहुसंख्य कर्मचाºयांची यावेळी उपस्थिती होती.