शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

ठाणेदार झटपट बदलतात, मात्र गुन्हेगारीचा आलेख वाढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:31 IST

विनायक येसेकर भद्रावती : औद्योगिक भद्रावती तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी तसेच अवैध व्यवसायाचा आलेख वाढताना दिसत आहे. मात्र यावर ...

विनायक येसेकर

भद्रावती : औद्योगिक भद्रावती तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी तसेच अवैध व्यवसायाचा आलेख वाढताना दिसत आहे. मात्र यावर वचक असणारे पोलीस प्रशासन पाहिजे तसे अंकुश आणण्यास असमर्थ ठरत असल्याचे गेल्या चार वर्षांच्या काळात दिसून आले आहे. चार वर्षाच्या काळात भद्रावती ठाण्यात सहा ठाणेदारांनी निरनिराळ्या पद्धतीने कार्य बजावले. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे म्हणावे की ठाणेदाराच्या झटपट होणाऱ्या बदल्यांमुळे की अन्य काही कारणांमुळे गुन्हेगारीवर अद्याप वचक बसलेला दिसत नाही.

इतिहासकालीन भद्रावती नगरी स्वातंत्र्यपूर्व काळात रेल्वेची वाहतूक चालू झाल्यापासून या शहरात पोलीस स्टेशन कार्यरत आहे. शहराचे रूपांतर तालुक्यात झाले. त्यातच आज औद्योगिक तालुका म्हणून भद्रावतीची ओळख आहे. या औद्योगिकरणामुळे शहरासह खेड्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत वाढ झाली आहे. तालुक्यात माजरी पोलीस स्टेशन वगळले तर घोडपेठ, चंदनखेडा यासारखे मोठमोठे तब्बल ७२ खेडे हे भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येतात. शहरासह या खेळातील लोकसंख्येच्या तुलनेने ७२ पोलिसांवर व पाच कर्मचाऱ्यांवर या पोलीस स्टेशन हद्दीचा कारभार आहे. स्मार्ट पोलीस स्टेशन होऊनही या चार वर्षाच्या काळात इतर गुन्ह्यासह अत्याचाराचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जिल्ह्यात दारूबंदी हटताच अवैध दारू विक्री कमी झाली असली तरी चोरीच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

बॉक्स

अवैध वाहतूक

औद्योगिक तालुका असल्याने या क्षेत्रात वेकोलि, कर्नाटक एम्टा तसेच इतर खासगी कंपन्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये चालणारी जड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच ट्रॅक्टरसह मोठमोठे वाहनांनी अवैध रेती वाहतूक केली जाते. या ट्रॅक्टरवर वन विभागाची नजर असली तरी याकडे महसूल व पोलीस विभागाने पूर्णपणे पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे.

बॉक्स

युवा वर्गाची स्टंटबाजी

शहरात सध्या बेधुंद मोटारसायकल चालवणाऱ्या युवा स्टंटबाजांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते. मागील वर्षी या स्टंटबाजीमुळे एकाचा जीवसुद्धा गेला होता. अशा या बेलगाम स्टंटबाजांवर पोलिसांनी अंकुश लावणे गरजेचे आहे.

कोट

भद्रावती क्षेत्रात २०११ मध्ये कार्य केलेले आहे. हे शहर माझ्यासाठी नवे नाही. कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता पूर्ण वेळ काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच गुन्हेगारीवर अंकुश आणू. तसेच स्टंटबाजीसारखे विषय प्रत्यक्ष हाताळण्याचा प्रयत्न करीन.

- गोपाल भारती ठाणेदार भद्रावती.

270821\20181208_140824.jpg~270821\img_20210827_150729.jpg

ठाणेदार झटपट बदलतात मात्र गुन्हेगारीचा आलेख वाढताच.~ठाणेदार झटपट बदलतात मात्र गुन्हेगारीचा आलेख वाढताच.