पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:53 IST2021-03-04T04:53:06+5:302021-03-04T04:53:06+5:30

चिमूर उपजिल्हा रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १ च्या रुग्णांच्या वापरासाठी असलेल्या शौचालयाच्या सीटमध्ये एक दिवसाचे मृत अर्भक आढळून आले. या ...

Police took CCTV footage into custody | पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात

चिमूर उपजिल्हा रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १ च्या रुग्णांच्या वापरासाठी असलेल्या शौचालयाच्या सीटमध्ये एक दिवसाचे मृत अर्भक आढळून आले. या प्रकरणी पोलीसांनी मंगळवारी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. वाॅर्डात उपस्थित कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदवून मृत अर्भक ताब्यात घेतले. चंद्रपूर येथील तज्ज्ञ डाॅक्टरांच्या समक्ष शवविच्छेदनासाठी पाठविले होते. आज अर्भकावर शवविच्छेदन करण्यात आल्याचे समजते. याचा अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने या घटनेमागील रहस्य कायम आहे. चिमूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३१८ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार मंगेश मोहोड करीत आहेत.

Web Title: Police took CCTV footage into custody