बरांज तांडा हातभट्टीवर पोलिसांची धाड
By Admin | Updated: March 12, 2017 01:36 IST2017-03-12T01:36:23+5:302017-03-12T01:36:23+5:30
तालुक्यातील बराज तांडा परिसरात झुडपी जंगलात हातभट्टीची दारू काढत असताना भद्रावती पोलिसांनी धाड टाकली.

बरांज तांडा हातभट्टीवर पोलिसांची धाड
दोन लाखांचा माल जप्त : तीन आरोपी फरार
भद्रावती : तालुक्यातील बराज तांडा परिसरात झुडपी जंगलात हातभट्टीची दारू काढत असताना भद्रावती पोलिसांनी धाड टाकली. यातील तीन आरोपी पसार झाले असून येथील हातभट्टी साहित्यासह दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई आज शनिवारी पहाटे ६ वाजता करण्यात आली.
यातील रविंद्र राहू नागपूरे, व्यंकट किसन मालोत, मानसिंग बिच्चू बानोत रा. बरांज तांडा अशी फरार आरोपींची नावे आहेत. होळीच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू बनविण्यासाठी तांडा परिसरातील झुडपी जंगलात असल्याची गुप्त माहिती ठाणेदार विलास निकम यांना मिळाली. त्या आधारे येथील पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, मेघाली गावंडे, किशोर मित्तलवार, नरेश शेरकी, शहाबाद शेख यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाड टाकली. या परिसरातून गुड, सडवा, हातभट्टी दारू व साहित्य असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र या कारवाईीची चाहूल लागताच यातील आरोपी पसार झाले. (शहर प्रतिनिधी)