सीमावर्ती भागातील पोलीस चौक्या पोरक्या
By Admin | Updated: June 4, 2017 00:32 IST2017-06-04T00:32:27+5:302017-06-04T00:32:27+5:30
महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा धडसी निर्णय घेऊन समाजहित जोपासले.

सीमावर्ती भागातील पोलीस चौक्या पोरक्या
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
आवारपूर : महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा धडसी निर्णय घेऊन समाजहित जोपासले. याच निर्णयाच्या अंमलबजावणीकरिता जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अत्याधुनिक प्रकारच्या पोलीस चौकी उभारण्यात आल्या. परंतु, त्या विनाकर्मचारी पोरकी झाल्याचे निदर्शनास येत असल्याने दारू बंदीचा फज्जा उडालेला दिसत आहे.
कोरपना तालुक्यातील वनोजा या गावाजवळ चंद्रपूर-यवतमाळ सीमावर्ती पोलीस चौकी उभारण्यात आली ती नांममात्र उभी असल्याचे दिसून येत आहेत. याठिकाणी पोलिसांचे कुठलेही कर्मचारी दिसून येत नाही.
या राज्य महामागार्ने रोजच तालुक्यतील सर्वच कारखाण्याची मालवाहू ट्रक चालतात. तसेच या परिसरातील नागरिकांना वणी हि बाजारपेठ जवळ पडत असल्याने सतत या रस्त्यावर वर्दळ असते. शेकडो वाहन या मार्गावरून प्रवास करतात. याच सीमेवर्ती भागात अवैध दारू विक्री व अवैद्य धंद्यांना जम बसविण्यासाठी पोलीस चौकी उभारण्यात आली. मात्र आता याठिकाणी कुणीही दिसत नाही.