अघोरी पूजा सुरू असताना पोलिसांची धाड; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 13:40 IST2020-02-09T13:40:16+5:302020-02-09T13:40:35+5:30

राजेशकुमार राजशेखर विरोपायना रा. कागजनगर, जुबेदा पंकज तायडे रा. दुर्गापूर अशी आरोपींची नावे आहेत.

Police fights during Agora worship; Both arrested | अघोरी पूजा सुरू असताना पोलिसांची धाड; दोघांना अटक

अघोरी पूजा सुरू असताना पोलिसांची धाड; दोघांना अटक

चंद्रपूर : बल्लारपुरातील कॉलरी प्रभागात अघोरी पूजा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास हरी गोरेलाल वर्मा यांच्या घरी धाड टाकली. यावेळी दोन व्यक्ती पाच फुटांचा खड्डा खोदून अघोरी पूजा करताना आढळून आले. त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

राजेशकुमार राजशेखर विरोपायना रा. कागजनगर, जुबेदा पंकज तायडे रा. दुर्गापूर अशी आरोपींची नावे आहेत. एवढा खोल खड्डा करून आरोपी काय करणार होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Police fights during Agora worship; Both arrested

टॅग्स :Arrestअटक