पोलिसांनी पाठलाग करून दारू तस्करांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:25 IST2021-04-26T04:25:15+5:302021-04-26T04:25:15+5:30
सध्या कोरोना या महामारी संकटामुळे संपूर्ण राज्यात टाळेबंदी करण्यात आले आहे. अशा भयंकर परिस्थितीतही दारू तस्करांनी अधिक पैसे मिळविण्याच्या ...

पोलिसांनी पाठलाग करून दारू तस्करांना पकडले
सध्या कोरोना या महामारी संकटामुळे संपूर्ण राज्यात टाळेबंदी करण्यात आले आहे. अशा भयंकर परिस्थितीतही दारू तस्करांनी अधिक पैसे मिळविण्याच्या मोहात नजीकच्या तेलंगणा राज्यातील दारू तस्करांशी साटेलोटे करून दारू तस्करी व विक्रीचा गोरखधंदा चालविला. अशातच शनिवारी रात्री गस्तीदरम्यान भंगाराम तळोधी बीट प्रमुख पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पटले व सहकारी हे गस्त करीत असताना दोन युवक संशयितरीत्या आपल्या दुचाकी वाहनावर पोत्यात काही साहित्य भरून भंगाराम तळोधी मार्गे गोंडपिपरीकडे येत असताना निदर्शनास येताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडून विदेशी दारूच्या दहा पेट्या जप्त केल्या आहेत. सदर कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे रोशन नंदू रामटेके (२३) रा. इंदिरानगर वाॅर्ड, आशिष मुरकुटे (२८) रा. भगतसिंग वाॅर्ड दोन्ही रा. गोंडपिपरी अशी आहेत.