५६ ठिकाणी पोलिसांची कडेकोट नाकेबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST2020-04-16T05:00:00+5:302020-04-16T05:00:49+5:30

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी बुधवारी जिल्ह्यातील नागरिकांशी व्हिडिओ संवाद साधताना लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्ये केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. आपला जिल्हा ग्रीन झोनमध्ये सध्या आहे. मात्र गावागावांमध्ये आशा वर्करकडून येणाऱ्या आकडेवाडीरीमधून, महानगरपालिका व पोलिसांकडून येणाºया आकडेवारीतून अनेकजण चंद्रपूरमध्ये हे नव्याने दाखल होत असल्याचे दिसून येते. यापुढे शासकीय कर्मचाऱ्यांसह अन्य कोणालाही अपडाऊनची परवानगी नाही.

Police blockade blockade at 56 places | ५६ ठिकाणी पोलिसांची कडेकोट नाकेबंदी

५६ ठिकाणी पोलिसांची कडेकोट नाकेबंदी

ठळक मुद्देपुढील १८ दिवस महत्त्वाचे : ग्रामसुरक्षा दल व नागरिकांनी गावे सील करावी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. चंद्रपूर जिल्हा देशभरात ग्रीन झोनमध्ये आला आहे. मात्र अद्यापही धोका टळला नसून आरोग्य विभाग प्रत्येक नागरिकांची तपासणी करीत आहे. सोबतच नवीन येणाऱ्या प्रत्येकाला तपासणी करूनच आतमध्ये घेतले जात आहे. जिल्ह्याच्या प्रमुख ५६ ठिकाणांवर पोलिसांचा २४ तास जागता पहारा आहे. यापुढे चंद्रपूरमध्ये कोणी येऊ नये व चंद्रपूरमधून कोणीही बाहेर जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश बुधवारी जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी बुधवारी जिल्ह्यातील नागरिकांशी व्हिडिओ संवाद साधताना लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्ये केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. आपला जिल्हा ग्रीन झोनमध्ये सध्या आहे. मात्र गावागावांमध्ये आशा वर्करकडून येणाऱ्या आकडेवाडीरीमधून, महानगरपालिका व पोलिसांकडून येणाºया आकडेवारीतून अनेकजण चंद्रपूरमध्ये हे नव्याने दाखल होत असल्याचे दिसून येते. यापुढे शासकीय कर्मचाऱ्यांसह अन्य कोणालाही अपडाऊनची परवानगी नाही. चंद्रपूरमध्ये कोणालाही येता येणार नाही व कोणालाही बाहेर पडता येणार नाही. अपवादात्मक स्थितीमध्ये पोलिसांची परवानगी घेऊनच शहरात तपासणीअंती दाखल होता येईल. प्रत्येकाची तपासणी आवश्यक आहे. नव्याने येणाºया आजारी व्यक्तीला क्वारंटाइन करण्याची थेट कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत. प्रत्येक नाक्यावर काळजी घेणे आवश्यक असून जिल्ह्याच्या प्रमुख ५६ ठिकाणांवर पोलिसांचा २४ तास जागता पहारा आहे. मात्र अशावेळी सीमावर्ती गावांमधील नागरिकांनी प्रशासनाचे कान व डोळे होणे आवश्यक आहे. राजुरा उपविभागीय अधिकाºयांनी या संदर्भात अतिशय कडक कारवाई केली असून लगतच्या तेलंगनामधून येणाऱ्या नागरिकांना मज्जाव केला आहे. काहींना काल सीमेवरून परत पाठविण्यात आले आहे. यापुढेही पोलिसांची परवानगी असेल तरच आतमध्ये घेतल्या जाईल. या जिल्ह्यात असणाºया सर्व बाहेरच्या नागरिकांची आम्ही काळजी घेत आहोत. त्याप्रमाणे सीमेलगतच्या असिफाबाद, आदिलाबाद, यवतमाळ, नागपूर याठिकाणी अडकलेल्याचीदेखील काळजी तेथे घेतली जात आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत कोणीही येण्याची व आतून बाहेर जाण्याची हिम्मत करू नये, असे स्पष्ट केले आहे.

बँकेत गर्दी करू नका
जिल्ह्यातील सर्व बँका सुरळीत सुरू असून नागरिकांनी आपल्या गावातील सेतू केंद्रांमध्ये बँकेचे व्यवहार आधार कार्ड दाखवून करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. डीजीपे सुविधाद्वारे सेतू केंद्रातून व पोस्ट कार्यालयातूनदेखील बँकेचे व्यवहार नागरिकांना यापुढे करता येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाणे गरजेचे नसून सर्व बँकादेखील सुरु ठेवण्यात आलेल्या आहे.

चंद्रपुरात अनेक छोटे रस्ते बंद
चंद्रपूर शहरांमध्ये अतिशय उत्तम अशी नाकेबंदी आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. शहरातील अनेक छोटे रस्ते बंद करण्यात आले आहे. ही नागरिकांची गैरसोय नसून कोरोनासारख्या महामारीसोबत लढण्यासाठी उचलण्यात आलेले सक्त पावले आहेत. शहरात मोठया प्रमाणात निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. येणाºया भाजीपाल्याचे ट्रकसुद्धा निर्जंतुकीकरण करूनच शहरात घेण्यात येत आहे.

कुंभार समाजाला परवानगी
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेनुसार कुंभार समाजाला त्यांची नियमित पारंपारिक कामे करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहेत. तसेच शहर व जिल्ह्यातील पशुखाद्य विक्री केंद्र उघडण्याचेदेखील निर्देश देण्यात आले आहे.


शेतीच्या कामांना बंधने नाही
शेतीच्या नियमित कामाला कोणतेही बंधन टाकण्यात आले नाही. जीवनावश्यक वस्तू दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत कायम उघडे असतील. २० तारखेनंतर रेशन दुकानांमधून किराणा वाटपालादेखील सुरुवात होणार आहे. सध्या रेशन दुकानातून दोन व तीन रुपये दराने गहू व तांदूळ मिळत आहेत. याशिवाय दरमानसी पाच किलो तांदूळ मोफत मिळत आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.


नव्या ५० पैकी ३९ नमुने निगेटिव्ह
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी कोरोना संसर्ग संशयित म्हणून ६७ नागरिकांची नोंद करण्यात आली. ५० स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३९ नमुनेही निगेटिव्ह निघाले आहेत. २० नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या २७ हजार ६६२ आहे. यापैकी दोन हजार ८५९ नागरिक निगराणीखाली आहेत. तर १४ दिवसांच्या होम क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या २४ हजार ८०३ आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ४९ आहे.
 

Web Title: Police blockade blockade at 56 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.