चंद्रपूरात पोलीस-आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST2021-01-13T05:11:44+5:302021-01-13T05:11:44+5:30
चंद्रपूर : जनविकास सेनेच्या स्थापना दिनानिमित्त स्थानिक चांदा क्लब ग्राऊंड येथे पोलीस-आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन १६ जानेवारी ...

चंद्रपूरात पोलीस-आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण
चंद्रपूर : जनविकास सेनेच्या स्थापना दिनानिमित्त स्थानिक चांदा क्लब ग्राऊंड येथे पोलीस-आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन १६ जानेवारी ते १९ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे. चांदा क्लब ग्राउंड येथे दररोज सायंकाळी ४ ते ६ वाजता दरम्यान फिजिकल ट्रेनर रोशन भुजाडे यांच्या मार्गदर्शनात युवक व युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कस्तुरबा रोड ज्युबिली शाळेजवळील वासनिक सर अकॅडमी येथे लेखी परीक्षेचे मार्गदर्शन तज्ञांमार्फत करण्यात येणार आहे. राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून या शिबिराच्या नोंदणीला सुरुवात करण्यात आली. उद्घाटन फिजिकल ट्रेनर रोशन भुजाडे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख, तर प्रमुख अतिथी म्हणून जिम ट्रेनर महेश सामनपल्लीवार, दिनेश सामनपल्लीवार, श्री स्पोर्टस्चे संचालक संदीप वाढई, स्केटींग कोच प्रवीण चवरे, जन विकास सेनेच्या मनिषा बोबडे निर्मला नगराळे उपस्थित होते. शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केले. नोंदणीसाठी अक्षय येरगुडे जनसंपर्क कार्यालय, पूर्ती बाजारजवळ, नानाजी नगर, नागपूर रोड, चंद्रपूर, वासनिक ॲकडमी ज्युबिली शाळेजवळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.