मनसेच्या महिलांनी बांधल्या पोलीस व कैद्यांना राख्या

By Admin | Updated: August 21, 2016 02:57 IST2016-08-21T02:57:35+5:302016-08-21T02:57:35+5:30

स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा जोपासत रक्षाबंधनाचा कार्यक्रम रामनगर पोलीस स्टेशन,

Police and prisoners built by the women of MNS | मनसेच्या महिलांनी बांधल्या पोलीस व कैद्यांना राख्या

मनसेच्या महिलांनी बांधल्या पोलीस व कैद्यांना राख्या

चंद्रपूर : स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा जोपासत रक्षाबंधनाचा कार्यक्रम रामनगर पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, ट्रॅफिक पोलीस स्टेशन, दुर्गापूर पोलीस स्टेशन तसेच जिल्हा कारागृह येथे साजरा केला.
या उपक्रमास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाद देऊन त्यांचे आभार मानले. जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांना राखी बांधल्यानंतर कारागृह अधिक्षकांनी छोटेखानी कार्यक्रम घेवून कैद्यांना मार्गदर्शनासाठी मनसे महिला सेनेच्या पदाधिकारी यांना पाचारण केले. याप्रसंगी शहर अध्यक्षा प्रतिमा ठाकूर, उपजिल्हा अध्यक्षा माया मेश्राम व प्रगती भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पक्षाचे जिल्हा संघटक राजू कुकडे , शहर संघटक मनोज तांबेकर, जिल्हा संघटक किशोर दहेकर, उपजिुल्हा संघटक राजू बघेल, प्रतिभा रोहनकर, वनिता चिलके, सुमन चामलाटे, राखी अग्रवाल, शालू पाटील, अनुराधा बोकडे आदींनी परिश्रम घेतले.
शिवसेनेतर्फे चालक-वाहकांना बांधल्या राख्या
बहीण भावांचा पवित्र सन रक्षाबंधन पर्वाचे औचित्य साधून शिवसेना महिला जिल्हा संघटिका कुसुमताई उदार यांच्या संकल्पनेने नुकतेच ट्रायस्टार हॉटेल चौकात त्यांच्या नेतृत्वात महिला चमूने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी तसेच बसच्या चालक वाहकांना रक्षा सूत्र मनगटाला बांधून त्यांचे तोंड गोड केले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर डेपोच्या मोरभवन चंद्रपूर बसचे चालक मालक यांना कुसमताई उदार यांनी राखी बांधली. या कार्यक्रमाला प्रामुख्याने कुसुमताई उदार, अनिता कुचनकार, पांडे, दिक्षा उईके, धनश्री मालेकर, संध्या शिडाम, कल्पना खेडेकर, पूष्पा खनके, संध्या घोडे, आदींची उपस्थिती होती.
रामनगर पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे (मनसे) च्या वतीने स्थानिक रामनगर पोलीस स्टेशन येथे अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला राखी बांधून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत चव्हाण व कर्मचाऱ्यांच्या मनसेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सुनीता गायकवाड यांच्या नेतृत्वात मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राख्या बांधल्या. यावेळी प्रामुख्याने जिल्हा सचिव अर्शिया शेख, शहर अध्यक्ष शकुंतला लिपटे, उपशहर उपाध्यक्ष रेखा गुरुम, शहर उपाध्यक्ष लता मुळे, विभाग अध्यक्ष सरोज गेडाम, पूजा खंडारे, शकुंतला वाघ, वैजंता गोवर्धन आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Police and prisoners built by the women of MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.