पोलिसांची कारवाई मंत्र्यांच्या दबावाखाली
By Admin | Updated: November 4, 2014 22:37 IST2014-11-04T22:37:19+5:302014-11-04T22:37:19+5:30
नगरसेवकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्याच्या तक्रारीवरून आपणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात या संदर्भातील तक्रारीची शहानिशा न करता भाजपातील एका मंत्र्यांच्या दबावाखाली

पोलिसांची कारवाई मंत्र्यांच्या दबावाखाली
चंद्रपूर : नगरसेवकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्याच्या तक्रारीवरून आपणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात या संदर्भातील तक्रारीची शहानिशा न करता भाजपातील एका मंत्र्यांच्या दबावाखाली आपणाविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत दानव यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
महापौर पदाच्या निवडणुकीपासून चंद्रपूर शहरातील काँग्रेसमधील नगरसेवकांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे तत्कालिन गटनेते संतोष लहामगे यांना पक्षातून निलंबित केल्यावर त्यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेऊन अपिल केली होती. त्यावर लहामगे यांना गटनेता या पदावर कायम ठेवत दोन दिवसांपूर्वी नवनियुक्त गटनेता प्रशांत दानव यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली होती. त्यावर आक्षेप घेत मंगळवारी दानव यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी निवडणुकीदरम्यान लहामगे यांनी निलंबित केले होते. मात्र या प्रकरणात नगरसेवक करीमलाला काझी आणि अन्य नगरसेवकांची व्यक्तीगत तक्रार न घेता केवळ संतोष लहामगे यांच्या तक्रारीवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे सत्याचा उलगडा झाला नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. प्रत्यक्षात लहामगे यांनी आपले व्यावसायिक हीत जोपासण्यासाठी पोलिसांशी सलगी वाढविली आहे. त्या माध्यमातून पोलिसांना हाताशी धरून आपल्याविद्ध अन्यायकारक त्या कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ज्या नगरसेवकांबाबत दानव यांनी खोटी स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्या नगरसेवकांनी यापूर्वी गटनेता या नांत्याने दानव यांना लिहिलेली पत्रेही जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे दानव यांनी पुराव्यादाखल दिली आहेत. गेल्या आठवडाभरापासून हे प्रकरण गाजत आहे. नव्या महापौरांनी आणि उपमहापौरांनी पदभार स्विकारला. मात्र नगरसेवकांमध्ये असलेल्या अंतर्गत वादामुळे विकास कामाला खीळ बसेल, अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)