पंतप्रधानांनी साधला अंगणवाडी सेविकांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:43 IST2018-09-11T22:43:10+5:302018-09-11T22:43:27+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील अंगणवाडी सेविकांशी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला.

पंतप्रधानांनी साधला अंगणवाडी सेविकांशी संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
आयुधनिर्माणी (भद्रावती) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील अंगणवाडी सेविकांशी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला.
संवादाचे प्रक्षेपण मंगळवारी भद्रावती येथील ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात करण्यात आले. अंगणवाडी सेविका सुनीता रोडे, रूखसाना शेख, विद्या देऊरकर, नंदा शेरकी, लक्ष्मी फुटाणे, साधना बंडावार, सुजाता रामटेके उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी सेविकांच्या समस्या जाणून घेतल्या. महाराष्ट्रात गणपती आगमणाची तयारी सुरू आहे, याचीही मराठीतून विचारणा केली थेट भारताच्या पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाल्याने अंगणवाडी सेविकांनी आनंद व्यक्त होत आहे.