शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पीएम केअर फंडाचे 35 व्हेंटिलेटर्स ऑक्सिजन फ्लो करण्यास कमकुवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 5:00 AM

केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून पीएम केअर फंडातून देशभरातील रुग्णालयांना व्हेंटिलेटर्स पुरविले होते. चंद्रपूर जिल्ह्यालाही ३५ व्हेंटिलेटर्स मिळाले. मात्र, हे व्हेंटिलेटर्स रुग्णांना पूर्ण क्षमतेनुसार ऑक्सिजन पुरवठा करण्यात कमजोर ठरले आहेत. व्हेंटिलेटर्स दुरुस्तीसाठी रुग्णालयात कायमस्वरूपी तंत्रज्ञही नाहीत. त्यामुळे कोविड रुग्णांसाठी पीएम फंडाचे व्हेंटिलेटर्स निरुपयोगी ठरत असल्याच्या रुग्णांच्या कुटुंबियांच्या तक्रारी आहेत.

ठळक मुद्देदुरुस्तीसाठी तंत्रज्ञच नाही : व्हेंटिलेटर्सचा दर्जा निकृष्ट, रुग्णांसाठी निरुपयोगी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गतवर्षी देशभरात कोरोना संसर्ग वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून पीएम केअर फंडातून देशभरातील रुग्णालयांना व्हेंटिलेटर्स पुरविले होते. चंद्रपूर जिल्ह्यालाही ३५ व्हेंटिलेटर्स मिळाले. मात्र, हे व्हेंटिलेटर्स रुग्णांना पूर्ण क्षमतेनुसार ऑक्सिजन पुरवठा करण्यात कमजोर ठरले आहेत. व्हेंटिलेटर्स दुरुस्तीसाठी रुग्णालयात कायमस्वरूपी तंत्रज्ञही नाहीत. त्यामुळे कोविड रुग्णांसाठी पीएम फंडाचे व्हेंटिलेटर्स निरुपयोगी ठरत असल्याच्या रुग्णांच्या कुटुंबियांच्या तक्रारी आहेत.देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच केंद्र सरकारकडून पीएम केअर्स फंडातून व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यात आले होते. गेल्यावर्षी जिल्ह्याला ३५ व्हेंटिलेटर्स मिळाले. त्यातील १० व्हेंटिलेटर्स महिला रुग्णालयात, तर २५ व्हेंटिलेटर्स शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आले. काही दिवस व्यवस्थित चालल्यानंतर त्यामध्ये आता अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे मेन्टेनन्स करूनच हे व्हेंटिलेटर्स रुग्णांसाठी वापरले जात आहेत. मात्र, त्यामध्ये वारंवार अडचणी येत आहेत. व्हेंटिलेटर्समधून ऑक्सिजन फ्लो होत नाही आणि प्रेशर होण्यातही बाधा निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत.  जिल्ह्यात कोरोनाबाधित गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे.  जिल्ह्यात सध्या ८४ व्हेंटिलेटर्स आहेत. 

उपचारादरम्यान मधेच बंद पडतात जिल्ह्याला ३५ व्हेंटिलेटर्स मिळाले. सर्वच व्हेंटिंलेटर्सचा सध्या वापर सुरू असल्याचा दावा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने केला आहे. मात्र, हे व्हेंटिलेटर्स उपचारादरम्यान अचानक बंद पडतात. उपस्थित डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते. काही व्हेंटिलेटर्स तर उपयोगाविना धूळ खात पडून आहेत, असा आरोपही रुग्णांच्या कुटुंबीयांनी केला.

जिल्ह्यात कोविड रूग्णांसाठी ८४ व्हेेंटिलेटर बेड्स विविध योजनेतून राज्य सरकारनेही चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला काही व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले. हे व्हेंटिलेटर्स कोविड काळात रुग्णांसाठी जीवनदायी ठरले. जिल्ह्यातील कोविड सर्व रुग्णालयात सद्यस्थितीत ८४ व्हेेंटिलेटर्स व १९७ आयसीयु बेड्स उपलब्ध आहेत. परंतु, वाढत्या रुग्णसंख्येमुळे हे बेड्स कमी पडले आहेत. 

पीएम फंडातून मिळालेल्या ३५ व्हेंटिलेटर्सची स्थिती चांगली नाही. परंतु, दुरुस्ती करून ते रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जात आहेत. काही व्हेंटिलेटर्स विदेशी बनावटीचे असल्याने दुरुस्तीसाठी वारंवार तंत्रज्ञ बोलाविण्याचा खर्च पेलण्यासारखा नाही. पण, आरोग्य आणीबाणीची गरज म्हणून तातडीने मेंटेनन्स करणे व रुग्णांना उपलब्ध करून देणे सुरू आहे.- डॉ. अविनाश टेकाडे, प्र. अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल