मातांनो जिजाऊ बनण्याचा प्रयत्न करा
By Admin | Updated: November 4, 2016 01:25 IST2016-11-04T01:25:19+5:302016-11-04T01:25:19+5:30
राजमाता जिजाऊने छत्रपती शिवरायांना घडविले. आज पुन्हा या देशाला छत्रपती शिवरायांची गरज आहे.

मातांनो जिजाऊ बनण्याचा प्रयत्न करा
चैताली खटी : ‘मी जिजाऊ बोलतेय’ कार्यक्रमातून केले प्रबोधन
कोरपना : राजमाता जिजाऊने छत्रपती शिवरायांना घडविले. आज पुन्हा या देशाला छत्रपती शिवरायांची गरज आहे. प्रत्येक घरी छत्रपती जन्माला यावा, यासाठी मातांनो जिजाऊ बनण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन चैताली खटी यांनी केले.
समाजसेवक डॉ. गिरीधरभाऊ काळे सामाजिक संस्था, बिबीच्या वतीने गावात दिव्यग्राम-२०१६ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी ‘मी जिजाऊ बोलतेय’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून चैताली खटी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीधर काळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेक सिमेंट वेलफेअर फाउंडेशन आवारपूरचे संजय पेठकर, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर आस्वले, पोलीस पाटील राहुल आसुटकर, संस्थेचे सचिव देविदास काळे, पुरुषोत्तम निब्रड, रत्नाकर चटप, रशिद शेख, हबीब शेख, अरुण रागीट आदी उपस्थित होते.
यावेळी गावात स्वच्छता राखण्यास मदत करीत असल्याबद्दल सेवार्थ ग्रुप, साई स्पोर्टिंग क्लब, सेव्हन स्टार स्पोर्टिंग क्लब, जय शिवशंकर स्पोर्टिंग क्लब, श्रीगुरुदेव सेवा मंडळ, हनुमान मंदिर समिती, शिवराजे क्रीडा मंडळ, श्रीगुरुदेव महिला भजन मंडळ, नुरानी संदल कमेटी, श्रीगुरुदेव भारुड मंडळ, नवचैतन्य भारुड मंडळ, क्रांतिज्योत युवा मंडळ, जागृत मंडळ, महात्मा गांधी तंटामुक्त समिती व पुतळा समितीचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक अविनाश पोईनकर यांनी केले. संचालन सूरज लेडांगे व आभार गणपत तुम्हाने यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)