महापौर कंचर्लावार यांच्या सदस्यत्व रद्दसाठी उच्च न्यायालयात याचिका
By Admin | Updated: September 10, 2015 00:45 IST2015-09-10T00:45:52+5:302015-09-10T00:45:52+5:30
महापौर राखी कंचर्लावार यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका काँग्रेसच्या नगरसेविका सुनिता लोढीया आणि माजी सभापती

महापौर कंचर्लावार यांच्या सदस्यत्व रद्दसाठी उच्च न्यायालयात याचिका
चंद्रपूर : महापौर राखी कंचर्लावार यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका काँग्रेसच्या नगरसेविका सुनिता लोढीया आणि माजी सभापती नंदू नागरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल केली आहे.
राखी कंचर्लावार या काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. मात्र त्यानंतर त्यांनी महापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपात प्रवेश घेतला. याशिवाय यादरम्यान काँग्रेस पक्षाचा व्हीप झुगारून ११ नगरसेवकांनी मतदान केले. विशेष म्हणजे, त्यावेळी सुनिता लोढिया या काँग्रेसकडून महापौर पदाच्या निवडणुकीत उभ्या होत्या. या प्रकरणात सुनिता लोढिया यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्यासह ११ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. ही याचिका विभागीय आयुक्तांनी खारीज केली. या निर्णयाला आव्हान देत लोढिया आणि नागरगर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली आहे. या ११ नगरसेवकांमध्ये माजी महापौर संगिता अमृतकर, स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे, रामू तिवारी यांचाही समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)