क्रीडांगण हाच स्वस्थ भारत निर्मितीचा पाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST2021-01-13T05:13:23+5:302021-01-13T05:13:23+5:30
राजुरा : क्रीडांगण हाच स्वस्थ भारत निर्मितीचा खरा पाया आहे, असे प्रतिपादन राजुरा नगर परिषदचे क्रीडा व शिक्षक सभापती ...

क्रीडांगण हाच स्वस्थ भारत निर्मितीचा पाया
राजुरा : क्रीडांगण हाच स्वस्थ भारत निर्मितीचा खरा पाया आहे, असे प्रतिपादन राजुरा नगर परिषदचे क्रीडा व शिक्षक सभापती राधेश्याम अडानिया केले.
आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट ऑफ इंडिया व टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया यांचा वतीने एशिया बुक ऑफ रेकॉर्डकरिता देशभरात १० जानेवरीला टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्हा टेनिस क्रिकेट संघटनेतर्फे राजुरा तालुका क्रीडासंकुलाच्या पटांगणावर जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन सभापती राधेश्याम अडानिया यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष हरिश्चंद्र विरुटकर, टेनिस क्रिकेट संघटनचे उपाध्यक्ष किशोर चिंचोलकर व सचिव भास्कर फरकाडे, वर्षा कोयचले उपस्थित होते. जिल्ह्यातील ५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला. रंगतदार सामन्यांचे अजिंक्यपद कर्णधार प्रसन्न मंगरुळकर व संघ यांनी जिंकले. संचालन जिल्हा संघटनेच्या सहसचिव पूर्वा खेरकर यांनी केले. आभार राजुरा तालुका टेनिस क्रिकेट प्रमुख मयूर खेरकर यांनी मानले.