बुद्धिबळ स्पर्धेत ब्रह्मपुरीचे खेळाडू चमकले

By Admin | Updated: August 6, 2015 01:58 IST2015-08-06T01:58:33+5:302015-08-06T01:58:33+5:30

ब्रह्मपुरी तालुका बुद्धिबळ संघटनेमार्फत विठ्ठल रुक्मिणी सभागृह ब्रह्मपुरी येथे दोन दिवशीय आॅल इंडिया ओपन रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा संघटनेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पार पडली.

The players of Brahmapuri shine in Chess competition | बुद्धिबळ स्पर्धेत ब्रह्मपुरीचे खेळाडू चमकले

बुद्धिबळ स्पर्धेत ब्रह्मपुरीचे खेळाडू चमकले

ब्रह्मपुरी: ब्रह्मपुरी तालुका बुद्धिबळ संघटनेमार्फत विठ्ठल रुक्मिणी सभागृह ब्रह्मपुरी येथे दोन दिवशीय आॅल इंडिया ओपन रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा संघटनेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पार पडली. नागपूरच्या सौरव खेडेकरने नऊपैकी आठ गुण मिळवून ब्रह्मपुरी एज्युकेशन ट्रॉफीसह कर्मयोगी मदनगोपाल भय्या स्मृती पुरस्काराचे १५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक प्राप्त केले.
दुसरे १० हजार रुपये दशरथ उराडे स्मृती पुरस्काराचे रोख पारितोषिक अमरावतीच्या पवन डोडेजाने मिळविले. या स्पर्धेत ओरिसा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालसह महाराष्ट्रातील एकूण १३८ खेळाडूंनी भाग घेतला.
चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच झालेल्या या अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन प्रथम नगराध्यक्ष नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भय्या यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. खिजेंद्र गेडाम होते. बक्षीस वितरण माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रिता दीपक उराडे या होत्या. इतर उपस्थितांमध्ये प्राचार्य डॉ. देवीदास जगनाडे, डॉ. माणिक खुणे, दिलीप पागे, प्राचार्य एन. एस. कोकोडे, स्वागताध्यक्ष प्रा. सुभाष बजाज, संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य सतीश शिनखेडे व सचिव हरिश्चंद्र चोले यांचा समावेश होता.
ब्रह्मपुरीच्या आंतरराष्ट्रीय रेटींग प्राप्त खेळाडूंनी ब्रह्मपुरी एज्युकेशनल सीटी ट्राफीत पारितोषिके प्राप्त केली. त्यात विक्रांत चोले, उल्हास वैद्य, विनय खोब्रागडे, रितेश उरकुडे, निलेश बांडे, सिद्धांत तायडे यांचा समावेश आहे.
पश्चिम बंगालचे बानिकांत नाथ, ओरिसाचे विष्णुप्रसाद अग्रवाल, बिहारचे शंकरकुमार, आंध्र प्रदेशचे बी.एस. दत्ता आणि ओरिसाचे आशीर्वाद स्पेन यांनी ओंकारलाल जाजू स्मृती, डॉ. वीणाताई भुसारी स्मृती असे विविध पुरस्कार प्राप्त केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The players of Brahmapuri shine in Chess competition