होळी खेळा मात्र जरा सांभाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:27 IST2021-03-26T04:27:27+5:302021-03-26T04:27:27+5:30

होळीचा सण हा आनंदाचा रंगोत्सव असल्याने खबरदारी घेऊन होळीचा आनंद सांभाळून करण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे. बाॅक्स ...

Play Holi but be careful | होळी खेळा मात्र जरा सांभाळून

होळी खेळा मात्र जरा सांभाळून

होळीचा सण हा आनंदाचा रंगोत्सव असल्याने खबरदारी घेऊन होळीचा आनंद सांभाळून करण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

बाॅक्स

अशी घ्या काळजी

होळी पेटविताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून अपघात होण्याची शक्यता असते.

अनेक ठिकाणी वीजवाहिन्या या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील.

होळी पेटविताना शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा, ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या.

विजेचे अपघात हा प्राणघातक असल्याने एक चूकही प्राणांकीत अपघातास कारणीभूत ठरू शकते.

रंगोत्सव साजरा करताना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यांपर्यंत उडणार नाही याची काळजी घ्या. रंग भरलेले फुगे फेकताना ते विजेचे खांब आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाही याची खबरदारी घ्या.

ओले कपडे, ओल्या चिंध्या विजेच्या तारावर फेकण्याचे टाळावे. अशा ओल्या कपड्यामुळे दोन फेजमध्ये शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. वीजवाहिन्यावर- तारावर अशा कपड्यांमुळे पावसाळ्यात दोन फेजमध्ये शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो.

बालकांना रंगोत्सव साजरा करतांना सांभाळून व मोठ्यांच्या निगराणीखाली वीज यंत्रणापासून लांब ठेवून साजरा करा.

वीज वितरण यंत्रणेचे रोहित्रे व तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब अंतरावरच रंग खेळा. रंग खेळतांना ओल्याचिंब शरीराने वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा संभाव्य धोका असल्याने विजेचा खांबांना स्पर्श करू नका. विजेच्या खांबासभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची खबरदारी घ्या.

Web Title: Play Holi but be careful