शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

बिबट्याचे झाडावर बस्तान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:13 PM

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन क्षेत्रालगत कवडशी ( रोडी) येथील शेतकरी शिवारात कामासाठी गेले असता शेतात असलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यानंतर बिबट्याने तेथील एका झाडावर बस्तान मांडले. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजता दरम्यान घडली. बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी झाडाभोवताल एकच गर्दी केली होती.

ठळक मुद्देहल्ल्यात शेतकरी जखमी : बघ्यांची उसळली होती गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन क्षेत्रालगत कवडशी ( रोडी) येथील शेतकरी शिवारात कामासाठी गेले असता शेतात असलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यानंतर बिबट्याने तेथील एका झाडावर बस्तान मांडले. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजता दरम्यान घडली. बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी झाडाभोवताल एकच गर्दी केली होती.आभिमान शंभरकर (५२) रा. कवडशी ( रोडी ) असे हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकºयाचे नाव आहे. चिमूर नगर परिषदेमधील प्रभाग क्रमांक ९ मध्ये येणाºया कवडशी ( रोडी ) येथील शिवारात व चिमूर पाणी पुरवठा वाटर फिल्टर प्लान्ट परिसरात मागील चार दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या बिबट्याने गुरुवारी अचानक कवडशी येथील शेतकरी अभिमन शंभरकर यांच्यावर अचानक हल्ला करून जखमी केले. मात्र शेतकºयाने मोठया हिंमतीने या बिबट्याचा हल्ला परतवला व स्वत:चे रक्षण केले. या हल्ल्यामध्ये शेतकरी जखमी झाले असून त्यांच्या मानेला, खांद्यावर जखमा झाल्या आहेत. जखमी शेतकºयावर उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार सुरू आहेत.बिबट्याने शेतकºयावर हल्ला करून शेतात असलेल्या मोहाच्या झाडावर चढून बस्तान मांडले. घटनेची माहिती वन विभागाला देताच वन परिक्षेत्र अधिकारी बी. पी. चिवंडे आपल्या ताफ्यासह घटना स्थळावर दाखल झाले. मात्र घटनास्थळावर बघ्यांची एक गर्दी उसळल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणेदार दिनेश लबडे ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले. सायंकाळपर्यंत ते गर्दीवर नियंत्रण ठेवून होते.कवडशीला जत्रेचे स्वरुपचिमूरपासून दोन कि.मी. अंतरावर उमा नदीच्या काठावर वसलेल्या कवडशी ( रोडी ) गावाशेजारी बिबट असल्याची माहिती शहरात पसरताच शेकडो महिला-पुरुषांनी बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे कवडशी गावाला जत्रेचे स्वरूप आले होते.बिबट्याला पांगवण्यासाठी फोडले फटाकेशेतकºयाला जखमी करून बिबट्याने चक्क मोहाच्या झाडाचा आसरा घेतला. त्यातच बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिबट्याला झाडावरुन उतरवण्यासाठी वन कर्मचाºयांनी फटाके फोडले. मात्र बिबट झाडाखाली आला नाही. त्यामुळे वन विभागाचे हे प्रयत्नही निष्फळ ठरले.ताडोबाची हौस कवडशीतअनेक पर्यटक वाघाला बघण्यासाठी हजारो रुपये खर्च करून ताडोबा व्याघ्र प्रकल्यात जातात. मात्र अचानक आलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी शेकडो नागरिक परिवरासह दाखल होत होते. काही नागरिक तर आम्ही पैसे खर्चून ताडोबाला जाऊ शकत नाही. आम्हाला वाघ बघू द्या, असे वन कर्मचाऱ्यांना विनवण्या करीत होते.बिबट्याच्या भीतीपोटी चक्क त्याने घातले हेल्मेटवाघाला पाहण्यासाठी अनेक हवस्या-गवश्यांनी गर्दी केली होती. त्यात एक महाभाग तर चक्क हेलमेट घालूनच आला होता. नागरिक कधी बिबट्याला तर कधी त्या महाभागाला बघत होते. सुरक्षा म्हणून त्याने ही पूर्वतयारी केली होती.