काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागातर्फे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST2021-06-09T04:35:34+5:302021-06-09T04:35:34+5:30
चंद्रपूर : जागतिक पर्यावरण दिननिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात १ ...

काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागातर्फे वृक्षारोपण
चंद्रपूर : जागतिक पर्यावरण दिननिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात १ लाख वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. याअनुषंगाने चंद्रपूर काँग्रेस पर्यावरण विभागाच्या जिल्हाध्यक्ष स्वाती राजेश धोटकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वडगाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, त्यांच्या पत्नी सोनल देवतळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन या अभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेस पर्यावरण विभागातील प्रणीता बोरकर, स्वाती बच्चुवार, सोनाली हेडाऊ, वर्षा बोरकर, अभिलाषा मैदळकर, कांता दखणे, प्रीती दखणे, योगीता धनेवार, स्वप्नाली दखणे आदी उपस्थित होते.
--------