यशवंत घुमे।लोकमत न्यूज नेटवर्कआनंदवन (ता.वरोरा) : जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जपानचे डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेल्या ‘पॅटर्न’चा अवलंबून करून समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात परिसरात स्थानिक प्रजातींच्या सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम श्रमसंस्कार छावणी शिबिरात राबविण्यात आला. यामध्ये देशभरातून पाचशे युवक युवतींनी सहभाग झाले आहेत.वाढत्या तापमानापासून सजीव सृष्टीचा ढासळलेला समतोल सांभाळण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज असल्याचे ओळखून आनंदवनच्या वतीने दरवर्षी मूल तालुक्यातील सोमनाथ येथे दरवर्षी श्रमसंस्कार छावणी आयोजित केल्या जाते. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा हे शिबिरात आनंदवनात सुरू आहे. या शिबिरादरम्यान विविध प्रजातींची झाडे मियावाकी पद्धतीने लावली जातात.यावर्षी आंबा, बेहडा हिरडा, हल्दू, पेटू, कवठ, शिसम, धामन, बिकामाई, कुसूम, रोहण, आवळा, रक्तचंदन, काळा-पांढरा शिरीष, खडसिंगी आदी मोठे, मध्यम झुडपी आणि लहान आकाराच्या ७४ प्रकारच्या झाडांची दोन एकर परिसरात लागवड करण्यात आली. लागवडीदरम्यान वेगवेगळ्या उंचीच्या वनस्पतींचा नैसर्गिक पद्धतीने मिलाफ करण्यात आला.एकमेकांच्या सहाय्याने व इतर वनस्पतींच्या वाढीला अडथळा न आणता सर्व झाडे नैसर्गिक जंगलाप्रमाणे वाढणार आहेत. त्यासाठी १०० बाय ४० स्केअरफुटाचे पट्टे तयार करून ही वृक्ष लागवड मोहीम पूर्ण झाली.या नाविण्यपूर्ण मोहिमेसाठी डॉ. विकास आमटे, डॉ. भरती आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संयोजक डॉ. शीतल आमटे, गौतम करजगी, सुधाकर कडू, रवी नलगंटीवार व देशभरातील विविध राज्यांचे युवा कार्यकर्ते प्रयत्नरत आहेत.अशी आहे वृक्ष लागवडीची पद्धतजपान देशातील डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेली वृक्ष लागवड पद्धत मियावाकी जंगल म्हणून ओळखल्या जाते. कमी जागा व कालावधीत घनदाट जंगल तयार होते. वृक्ष लावण्यासाठी निवडलेल्या जमिनीवर गहू, तणीस व मका कणसाच्या सालीचा भूगा करून आच्छादन घातल्या जाते. जीवामृताचा वापर केला जातो. जमीन नांगरून भुसभुशीत केली जाते. त्याचा फायदा झाडाच्या तंतूमुळांना होतो. चार प्रकारच्या वृक्ष प्रजाती निवडण्यात आल्या. त्यामुळे कोणतीही वनस्पती शेजारच्या वनस्पतीच्या वाढीला अडथळा ठरत नाही. ही झाडे एकमेकांपासून ६० सेंटीमीटर अंतरावर लावली जातात.विदर्भातील सर्वाधिक तापमान लक्षात घेता मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करणे उपयुक्त ठरणार आहे. यात जैवविविधता जपल्या जाते. ही १०० टक्के सेंद्रीय पद्धत आहे. याद्वारे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. श्रमसंस्कार छावणीत ६ हजार झाडे लावण्यात आली. पुढील आठवड्यात ७ हजार झाडे लावणार आहोत.-डॉ. शीतल आमटे, शिबिर संयोजक आनंदवन, वरोरा
आनंदवनात ‘अकिरा मियावाकी पॅटर्न’ने वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:50 IST
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जपानचे डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेल्या ‘पॅटर्न’चा अवलंबून करून समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात परिसरात स्थानिक प्रजातींच्या सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम श्रमसंस्कार छावणी शिबिरात राबविण्यात आला. यामध्ये देशभरातून पाचशे युवक युवतींनी सहभाग झाले आहेत.
आनंदवनात ‘अकिरा मियावाकी पॅटर्न’ने वृक्षारोपण
ठळक मुद्देनैसर्गिक पद्धतीने तयार होणार जंगल : श्रमसंस्कार छावणीत देशभरातील शेकडो कार्यकर्ते सहभागी