गावे समृद्ध करण्यासाठी नियोजन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST2021-01-25T04:28:41+5:302021-01-25T04:28:41+5:30
चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाने नियोजन करावे, असे निर्देश राेहयो व जलसंधारण ...

गावे समृद्ध करण्यासाठी नियोजन करावे
चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाने नियोजन करावे, असे निर्देश राेहयो व जलसंधारण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी केले. शुक्रवारी नियोजन भवनात पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बाेलत होते.
यावेळी रोहयोचे आयुक्त शंतनू गोयल, जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, प्रभारी उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक मंगेश आरेवार, सर्व नियंत्रक प्रमुख, सर्व गट विकास अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी जिल्ह्यातील रोहयो कामांची माहिती जाणून घेतली. शिवाय, मोलाच्या सूचना केल्या. गावांच्या विकासासाठी व नागरिकांना रोजगार देण्यासाठी सर्व कामांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.