वाहतूक समस्येवर उपाय योजना करावी

By Admin | Updated: January 18, 2017 00:41 IST2017-01-18T00:41:18+5:302017-01-18T00:41:18+5:30

शहरात वाहतूकीच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे शहरात वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

Plan a solution to the traffic problem | वाहतूक समस्येवर उपाय योजना करावी

वाहतूक समस्येवर उपाय योजना करावी

निवेदन : चंद्रपूर बचाव संघर्ष समितीची मागणी
चंद्रपूर : शहरात वाहतूकीच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे शहरात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या समस्यांची सोडवणूक करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने मनपाचे आयुक्त संजय काकडे यांना निवेदन देण्यात आले
काही महिन्यांपासून जटपुरा गेट ते गांधी चौक या मार्गावर वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ नसणे, आॅटोरिक्षा चालकांसाठी आॅटोरिक्षा स्टॅण्ड नसणे, अशा अनेक समस्या चंद्रपुरकरांना भेडसावत आहेत. या सर्व विषयांची दाखल घेऊन समस्या सोडविण्याची मागणी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या शिष्टमंडळात चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, कोषाध्यक्ष दत्तप्रसन्न महादानी, संघटन सचिव सुहास अल्मस्त, सजिद कुरेशी, डॉ.दास, महेंद्र राळे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Plan a solution to the traffic problem