शेतकºयांसाठी राष्टÑवादीचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:50 IST2017-10-05T00:50:16+5:302017-10-05T00:50:26+5:30
शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी तसेच त्यांच्या मालाला हमी भाव या मागण्यांसह इतर मागण्या दिवाळीपूर्वी पुर्ण कराव्यात, या मागणीसाठी आज गुरुवारी दुपारी १२ वाजता .....

शेतकºयांसाठी राष्टÑवादीचे धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी तसेच त्यांच्या मालाला हमी भाव या मागण्यांसह इतर मागण्या दिवाळीपूर्वी पुर्ण कराव्यात, या मागणीसाठी आज गुरुवारी दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवा अध्यक्ष मुनाज शेख यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
त्यानंतर तहसीलदार महेश शितीळे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. शेतकºयांच्या मालाला योग्य हमी भाव द्यावा, शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी. ३५० रुपयांवरून ७५० रुपयांवर गेलेला गॅस सिलिंडरचा दर तत्काळ कमी करावा. ६० रुपयांवरील पेट्रोल ८० रुपयांपर्यंत गेल्याने त्याचा विपरित परिणाम सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पेट्रोल जन्य पदार्थाचे दर कमी करण्यात यावे. भरमसाठ वाढलेले विजेचे दर कमी करण्यात यावे. दारिद्रय रेषेखालील येणाºया लाभार्थी व गॅस धारकांना केरोसीन पूर्वीप्रमाणे वाटप करण्यात यावे. यासह इतर मागण्या यावेळी रेटून धरण्यात आल्या.
यावेळी पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद जीवतोडे, शहर अध्यक्ष सुनिल तहाले, राविकाँ तालुका अध्यक्ष रोहन खुटेमाटे, आशिष कार्तेकर, सुशांत लांडगे, किशोर पडवे, विठ्ठल हनवते, विलास धांडे, अॅड. कुणाल पथाडे, अजय फटले, सुधाकर रोणकर, नामदेव मत्ते, पंढरी धोंगडे, पुं.ध. वागदरकर व भुमेश वालदे व विरद्र नागपुरे, रोशन काभरेड्डीवार, राकेश कितेकर, मनोज कायरकर, निलेश जगताप, पंकज चिलके, अनंता मांढरे, अमोल बरगे, शंकर खैरे, विक्की चोढाले, अयफाज पठान, अन्वर सैय्यद आदी उपस्थित होते.