खड्ड्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST2021-04-10T04:27:47+5:302021-04-10T04:27:47+5:30
कचरा संकलकांची संख्या वाढवावी चंद्रपूर : शहरातील प्रत्येक प्रभागात घंटागाडीद्वारे कचरा संकलन केल्या जात आहे. मात्र काही वार्डातील संकलकांची ...

खड्ड्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त
कचरा संकलकांची संख्या वाढवावी
चंद्रपूर : शहरातील प्रत्येक प्रभागात घंटागाडीद्वारे कचरा संकलन केल्या जात आहे. मात्र काही वार्डातील संकलकांची संख्या कमी असल्यामुळे असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत आहे. कर्मचाऱ्यांची पाच वर्षापूर्वी नियुक्ती करताना त्यावेळची लोकसंख्या विचारात घेण्यात आली होती. मात्र आता लोकसंख्या वाढली असतानाही कर्मचारी संख्या मात्र तेवढीच आहे.
बेरोजगार संस्थांना हवे काम
चंद्रपूर: कोरोना संकटामुळे प्रत्येक जण संकटात आले आहे. यामध्ये बेरोजगार संस्थाही कामे नसल्यामुळे अडचणीस सापडल्या आहे. त्यामुळे शासनाने या संस्थांनाही छोटेमोठे काम देवून संस्थाना रुळावर आणावे, अशी मागणी केली जात आहे.
अतिक्रमण हटविण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषत: तुकूम, वडगाव, बंगाली कॅम्प आदी परिसरामध्ये अतीक्रमणधारकांची संख्या अधिकर आहे.
टाॅवरची निर्मिती करावी
चंद्रपूर : शहरातील काही भागामध्ये भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या महाविद्यालयनीन विद्यार्थ्याची परीक्षा सुरु आहे. अशावेळी त्यांना कव्हरेजच मिळत नसल्याने ऑनलाईन अभ्यासक्रम कसा करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
नोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
चंद्रपूर : महापालिके अंतर्गत येत असलेल्या काही प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावर रस्त्यावर फिरत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रात्री रस्त्यावर बसून रहात असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. यावर आळा घालण्याची मागणी केली आहे.
नामफलक लावण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातून अनेक राज्य महामार्ग, तालुका मार्ग, ग्रामीण मार्ग गेले आहेत. मात्र यातील बहुतांश रस्त्यावर गावाच्या नावाचा फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असते. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावरील नाव दिसत नसल्याची स्थिती आहे.
वीज बील भरणे झाले कठीण
चंद्रपूर : शहरातील काही भागातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल येत असल्यामुळे ते भरणे कठीण झाले आहे. विशेषत: मागील लाॅकडाऊन पासून काहींनी वीज बिल भरलेच नाही. त्यातच आता पुन्हा लाॅकडाऊन होण्याची स्थिती आहे. त्यामुळे या नागरिकांवर सध्यास्थितीत अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
अन्नपदार्थांची तपासणी करावीचंद्रपूर : शहराती काही भागामध्ये अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री केली जात आहे. सध्या कोरोना संकटामुळे हाॅटेलमध्ये बसून खाण्यावर प्रतिबंध आहे. त्यामुळे काही नागरिक पदार्थ पॅकींग करून नेत आहे. मात्र हातठेल्यावर उघड्यावरील पदार्थ दिल्या जात असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गतिरोधकाअभावी अपघाताची शक्यता
चंद्रपूर : चंद्रपूर ते दुर्गापूर मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु बऱ्याच ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी या रस्त्यावर गतिरोधक निर्माण करण्याची मागणी नागरिकांनी केली.
बेरोजगारांना काम द्या
चंद्रपूर : मागील काही दिवसापासून प्रकल्पग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यातच कोरोनामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. विविध कंपनीने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेत बेरोजगारांना सावरावे, अशी मागणी केली जात आहे.
पोलिसांचा भार कमी करावाचंद्रपूर : चंद्रपूर शहरात महापालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. शहराची लोकसंख्या व नगर विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे शहरात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, वाहतूक पोलिसांच्या मंजुर असलेल्या जागांपेक्षा अनेक जागा रिक्त आहे. त्यामुळे अन्य पोलीस कर्मचाऱ्यांवर भार पडला आहे.