चिंचाळा जि. प. शाळा बनली आंतरराष्ट्रीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 23:02 IST2018-12-27T23:02:06+5:302018-12-27T23:02:45+5:30
राज्यातील जिल्हा परिषदेच्या १३ शाळा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) जोडण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी या नावाने आंतरराष्ट्रीय १३ शाळांचे एकाच वेळी उदघाटन करण्यात आले. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव चिंचाळा येथील जि. प. शाळेचा समावेश आहे.

चिंचाळा जि. प. शाळा बनली आंतरराष्ट्रीय
लोकमत न्यूज नेटवर्क
घोडपेठ : राज्यातील जिल्हा परिषदेच्या १३ शाळा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) जोडण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी या नावाने आंतरराष्ट्रीय १३ शाळांचे एकाच वेळी उदघाटन करण्यात आले. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव चिंचाळा येथील जि. प. शाळेचा समावेश आहे.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चिंचाळाच्या नामफलकाचे अनावरण जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर, जि. प. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती कृष्णा सहारे, सभापती समाजकल्याण ब्रिजभूषण पाझारे, सभापती कृषी व पशुसंवर्धन अर्चना जीवतोडे, सभापती वंदना पिंपळशेंडे, उपसभापती चंद्रकांत ढोडरे, प्रविण बोडेकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर, गटशिक्षणाधिकारी समाधान भसारकर, शिक्षण विस्तार अधिकारी धनराज आवारी, शिक्षण विस्तार अधिकारी धनपाल फटिंग यांची उपस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमातून शिक्षण
मातृभाषेतून शिक्षण व इंग्रजीवर प्रभुत्व या पध्दतीने शाळेचे शिक्षण होणार आहे. महाराष्ट्र आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नित नव्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना आता आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमातून शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. सध्या चिंचाळा येथील शाळेमध्ये नर्सरी ते इयत्ता सातवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण डोर्लीकर, संगीता बेले यांनी केले तर मुख्याध्यापक नामदेव आस्वले यांनी उपस्थितांचे आभार मानले.